ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

25 राज्यांतील शेतकरी संघटनांचा ‘सिफा’ला एकमुखी पाठिंबा:सर्वोच्च न्यायालयातील कृषी नीतीच्या कायदेशीर लढ्याला देशव्यापी बळ देण्याचा केला संकल्प‎

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कन्सोर्टियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन्स अर्थात ‘सिफा’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी समिती व पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक कापूसनगरी अकोला येथे पार पडली. या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील विविध राज्यांतून आलेले प्रमुख शेतकरी नेते, कृषी तज्ज्ञ व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय शेतीसमोरील आव्हानांवर चर्चा केली. या अधिवेशनात जेव्हा देशभरातून आलेल्या सर्व शेतकरी संघटनांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी आपण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेला एकमुखी मान्यता देत संपूर्ण व बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याची माहिती सिफा व किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी दिली. येथे ‘सिफा’च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दोन दिवसीय अधिवेशनाची माहिती देण्यात आली. यावेळी सिफाचे राष्ट्रीय महामंत्री शंकर रेड्डी, माजी अध्यक्ष सिफाचे सिंग, राष्ट्रीय मीडिया प्रभारी निमिषा सिंग, किसान ब्रिगेडचे धनंजय मिश्रा यांच्यासह २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकाश पोहरे म्हणाले की, देशाच्या अन्नदात्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेचा एकच संकल्प आहे. “शेतकरी आता मजबूर नाही, तर आत्मनिर्भर व सक्षम झाला पाहिजे. या याचिकेत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य मोबदला मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. सरकारने केवळ एमएसपी नव्हे तर स्ट्राँग सपोर्ट प्राइझ लागू करावी, अशी मागणी केली. अधिवेशनात ‘सिफा’चे राष्ट्रीय सल्लागार विशाल रावत यांनी एमएसपी संदर्भातील जनहित याचिका व सरकारी कृषी आकडेवारीवर विवेचन केले. अधिवेशनात काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत व पंजाबपासून छत्तीसगडपर्यंतच्या शेतकरी नेत्यांनी असा निर्धार व्यक्त केला की, प्रकाश पोहरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू केलेली ही कायदेशीर लढाई देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाईल. यातून शेतकऱ्यांना एसएसपी मूल्याची कायदेशीर हमी मिळवून देण्यासाठी संपूर्ण देश एकजुटीने उभा राहील, असे सांगण्यात आले.पंजाबचे माजी सीफा अध्यक्ष व स्वामीनाथन समितीचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते सतनाम सिंह बेहरू यांनी अन्नसुरक्षा कायदा आणि त्याचा शेतकऱ्यांवरील विपरित परिणाम यावर परखड विश्लेषण मांडले. हरियाणातील राष्ट्रीय किसान संघटनेचे अध्यक्ष जसवीर सिंह भट्टी यांनी आयात-निर्यात कृषी धोरणांबाबत शेतकऱ्यांची भूमिका मांडली असल्याचे सांगितले. यावेळी किसान ब्रिगेडचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील व्हॅली किसान वेल्फेअरचे अध्यक्ष एम. वाय. जरगर यांनी फलोत्पादन धोरणे, उत्पादन आणि विपणनासाठी शासकीय सहकार्याची गरज अधोरेखित केली. मध्य प्रदेशातील क्रांतिकारी किसान मजदूर परिषदेचे अध्यक्ष लीलाधर राजपूत यांनी शेतकऱ्यांची बिकट आर्थिक स्थिती व कर्जमुक्तीच्या उपाययोजनांवर भाष्य केले तर छत्तीसगड किसान मजदूर युनियनचे अध्यक्ष पारसनाथ साहू यांनी कृषी अवशेष व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतींवर भर दिला. भारती तकासले यांनी कार्बन क्रेडिट या उदयोन्मुख विषयावर विचार मांडले. यात तामिळनाडूच्या डॉ. सेनबागम राजा यांनी धरणातील पाणी पाइपद्वारे पुरवठा व कार्यक्षम जलव्यवस्थापनावर भर दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर