ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

अधिक मासातील आध्यात्मिक ज्ञान प्रबोधनातून मानवाचा बौद्धिक विकास:ह.भ.प. ॲड.शेवाळे महाराजांच्या भागवत सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. दर ३ वर्षांतून एकदा येणारा हा शुभ महिना आहे, कारण अधिक महिना हा भक्ती, देवधर्म करणे, संत महात्म्यांचे कथा, भागवत ऐकणे यासाठी शुभ असतो; म्हणूनच या अधिक महिन्यात अनेक ठिकाणी कथा व भागवत सप्ताहांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून भाविकांना अध्यात्माचा बोध प्राप्त होतो, म्हणून अधिक मासातील आध्यात्मिक ज्ञान प्रबोधनातून मानवाचा बौद्धिक विकास होतो, असे मनोगत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. अवंती नगर मधील गणेश विठ्ठल मंदिर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाचे शुभारंभ नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक महेश इंगळे यांचा भागवत साप्ताहिकाचे कथाकार ह.भ.प. ॲड. शेवाळे महाराज यांनी सत्कार करून आशीर्वाद दिले. पुढे बोलताना नगरसेवक महेश इंगळे यांनी सांगितले की, गेल्या ३३ वर्षांपासून दर ३ वर्षांनी रमेश शिंदे, आपलं चंद्र वर्ष ३५४ दिवसांचं, पण सूर्य वर्ष ३६५ दिवसांचं असतं. हे ११ दिवसांचं अंतर भरून काढण्यासाठी दर ३२ महिन्यांनी एक महिना जास्त धरला जातो, तोच अधिक महिना असतो. या भागवत सप्ताह श्रवणाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते श्रीमद् भागवत ग्रंथाची व छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली. वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात येथील मराठा समाजाचे नेते तथा गणेश विठ्ठल मंदिर सांस्कृतिक मंडळाचे विश्वस्त समिती अध्यक्ष सुनील रसाळे यांनी अधिक महिन्यात भागवत सप्ताह आयोजित करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. आपल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातही या अधिक महिन्यात अनेक स्वामी भक्त स्वामींचे दर्शन घेऊन धन्य होतात. या धार्मिक सोहळ्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विश्वस्त मंडळ नंदकुमार चव्हाण, अण्णाराव पाटील, बंडू पवार, राजू जवंजाळ, महेश पवार, भाऊ धोत्रे, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. अधिक महिन्याचे वैज्ञानिक अन् धार्मिक महत्त्व

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर