ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जिममध्ये जास्त वजन उचलल्याने मेंदूची आर्टरी फाटली:नागपुरातील धक्कादायक घटना; डॉक्टरांनी ‘गोल्डन अवर’मध्ये वाचवले तरुणाचे प्राण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पिळदार शरीरयष्टीसाठी व्यायामशाळेत क्षमतेहून जास्त वजन उचलणाऱ्या एका तरुणाची मेंदूची आर्टरी अर्थात रक्तवाहिनी फाटल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या घटनेत सदर तरुणाचे प्राण संकटात सापडले. पण त्याला गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. यासंबंधीच्या माहितीनुसार, ओम भोयर असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ओम हा गत 10 तारखेला नेहमीसारखा जिममध्ये गेला होता. तिथे त्याने आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलले. त्यामुळे त्याच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर दबाव निर्माण झाला. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. आपल्यासोबत नेमके काय होत आहे? हे लक्षात येण्यापूर्वीच त्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्याला लगेचच लगतच्या रुग्णालयात हलवले. तिथे झालेल्या एमआरआय तपासणीत त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी आर्टरी फाटल्याचे निष्पन्न झाले. रक्तवाहिनीत झाली होती रक्ताची गुठळी न्युरोव्हॅस्क्युलर स्पेशालिस्ट डॉ. सचिन ढोमणे यांनी त्याची तपासणी केली. त्यात ‘एमआरआय’च्या अहवालात ओमच्या मेंदूतील रक्तवाहिनी फाटून गंभीर रक्तस्राव झाल्याचे आणि रक्ताची गुठळी साचल्याचे निदान झाले. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने रुग्णाला तातडीने क्रीसेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर ढोमणे यांनी व्यायाम करताना तरुणांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अतिव्यायाम करणे हे नेहमीच धोकादायक असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची क्षमता वेगळी असते. त्यामुळे किती ताण सहन करून व्यायाम करायचा हे स्वतः त्या व्यक्तीनेच ठरवावे. अन्यथा क्षमतेहून अधिक व्यायाम केला तर ती गोष्ट त्याच्या जिवावरही बेतू शकते, असे ते म्हणालेत. पायाच्या शिरेतून मेंदूवर शस्त्रक्रिया रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर ढोमणे यांनी ‘इंडोव्हॅस्कूलर सर्जरी’ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ या आधुनिक तंत्राचा वापर केला. यामध्ये रुग्णाच्या पायात एक छोटेसे छिद्र करून कॅथेटरच्या साहाय्याने डॉक्टर थेट मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचले. तेथे अडकलेली रक्ताची गुठळी ‘न्युरो स्टेंट’च्या मदतीने अत्यंत कौशल्याने बाहेर काढली. यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत झाला आणि ओमचा अर्धांगवायू बरा होण्यास सुरुवात झाली. पायाच्या शिरेतून मेंदूवर शस्त्रक्रिया रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉ. ढोमणे यांनी ‘इंडोव्हॅस्कूलर सर्जरी’ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ या आधुनिक तंत्राचा वापर केला. यामध्ये रुग्णाच्या पायात एक छोटेसे छिद्र करून कॅथेटरच्या साहाय्याने डॉक्टर थेट मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचले. तेथे अडकलेली रक्ताची गुठळी ‘न्युरो स्टेंट’च्या मदतीने अत्यंत कौशल्याने बाहेर काढली. यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत झाला आणि ओमचा अर्धांगवायू बरा होण्यास सुरुवात झाली. रुग्णांसाठी पहिले 6 तास ‘गोल्डन अवर’ अशा प्रकरणांतील रुग्णांसाठी पहिले 6 तास हे ‘गोल्डन अवर’ असतात. जितक्या लवकर ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ होईल, तितक्या लवकर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता वाढते. ओमच्या बाबतीत वेळेत घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला. काही रुग्णांमध्ये 24 तासांपर्यंत ही शस्त्रक्रिया करता येते, असे डॉक्टरांनी याविषयी बोलताना सांगितले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर