ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

कोंडीजवळील अपघातात वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन:पोलिस-घटनास्थळी उपस्थित तरूणांच्या समयसूचकतेमुळे अपघातातील दोघांचे प्राण वाचले‎‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर कोंडी हॉटेल सुनील जवळ दुचाकीवरील चंद्रकांत जाधव, महेंद्र बिराजदार (एचपी पेट्रोल कर्मचारी) या दोघांचा बुधवार दि. २७ मे रोजी अपघात होऊन गंभीर जखमी झाले होते. सदर अपघातामधील रक्तबंबाळ जखमींची चिंताजनक अवस्था पाहून वायूवेग पथक क्र. ६ मधील कार्यरत अधिकारी मोवानि राहुल खंदारे, समोवनि राजकुमार देशमुखसह चालक अमोल माने यांनी समयसूचकता दाखवून स्वतः तातडीने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करून वर्दी मधील आपुलकीचे दर्शन दिले आहे. सदर अपघातामधील दोघांच्या डोक्याला मार लागला होता व ते रक्तबंबाळ झाले होते. मात्र, पाहणाऱ्यांची गर्दी खूप मोठी होती. उपचारासाठी त्यांना पाठवण्यासाठी कोणी मदत करण्यास तयार नव्हते. सदर रस्त्याच्या सर्विस रोड वरून वायूवेग पथक क्र. ६ मधील कार्यरत अधिकारी मोवानि राहुल खंदारे, समोवनि राजकुमार देशमुखसह चालक अमोल माने हे निघाले होते. अपघात पाहून स्वतः उतरून राजकुमार देशमुख यांनी उचलून एका अपघातग्रस्ताला ऑटोरिक्षामध्ये तर दुसऱ्या अपघातग्रस्ताला ओम्नी मध्ये टाकून अगदी कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे टाकलेल्या वाहनांमध्ये बसून धीर देत सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केले. वेळेत उपचारासाठी दाखल केल्याने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मात्र, डोक्याला जबरदस्त मार लागला आहे, फक्त हात पायाची हालचाल होत आहे. सदर ठिकाणी दीड दोनशे लोकांपैकी कोणाचेही त्यांना हात लावायचे धाडस झाले नाही. मात्र, वर्दीतल्या माणुसकीने एका रिक्षावाल्याला थांबवले. ^अपघातावेळी ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातानंतरचा पहिला ६० मिनिटांचा कालावधी या वेळेत जखमी व्यक्तीला तातडीची वैद्यकीय मदत व उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता सर्वाधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पहिल्या एका तासात उपचार मिळाल्यास रस्ते अपघातातील सुमारे ५०% मृत्यू टाळता येऊ शकतात. त्यानुसार मी व माझ्या कर्मचाऱ्यांनी कुठलाही विलंब न करता सदर अपघातामधील जखमींना वेळेत उपचारासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. माणूस म्हणून ते माझे कर्तव्य आहे. राहुल खंदारे, मोटार वाहन निरीक्षक, सोलापूर. पहिल्या तासात उपचार मिळाल्यास अपघातातील ५०% मृत्यू टाळता येतात

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर