ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

प्राजक्त तनपुरेंना राजकीय श्रद्धांजली, त्यांनी सुखात राहावे:पंतप्रधानांवर विश्वास, ‘ऑपरेशन सिंदूर 1’ मध्ये आधी पीओके घ्यावे, संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक सल्ला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्राजक्त तनपुरे यांना मी राजकीय श्रद्धांजली वाहतो, त्यांना नवीन मार्ग दिसलेला आहे, त्यांनी तिकडे सुखात रहावे, यापुढे आमच्या दारात येऊ नये, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचास पूर्ण विश्वास आहे, त्यांनी ऑपरेशन सिंदूर 1 मध्ये पीओके घ्यावे, आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर 2 मध्ये संपूर्ण पाकिस्तान घ्यावे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पाळले जात नसतील तर मंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यांनी कारवाई करत आदर्श घालून द्यावा. आमच्या अमृता वहिनी सायकल घेऊन फिरतात, आणि त्यांचे मंत्री असा ताफा घेऊन फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे संजय राठोड यांच्या ताफ्यावरील प्रश्नावर बोलाताना राऊतांनी म्हटले आहे. 1948 मध्ये गेलेले 3 प्रांत आधी ताब्यात घ्या संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 1 अजून संपलेले नाही, मग ऑपरेशन सिंदूर 2 आले कुठून? मुळात ऑपरेशन 1 पूर्ण झालेले नाही. ऑपरेशन 1 हे आंतरराष्ट्रीय राजकीय दबावामुळे आपण बंद केले. त्यांचा उद्देश होता की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायचे हे सर्वांना माहिती आहे. ते आधी ताब्यात घ्या. 1948 मध्ये भारताच्या ताब्यातील 3 प्रांत जे पाकिस्तानकडे गेले ते ऑपरेशन 1 मध्ये घेण्याचे भारताचे ध्येय होते. पण हेच पूर्ण झाले नाही आणि लष्कर प्रमुख ऑपरेशन 2 ची घोषणा करताय ही 2029 च्या निवडणुकीची तयारी आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. देशाचा भुगोल याने वाढणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत
करू. भाजपविरोधात लढायला देशातील जनता सज्ज संजय राऊत म्हणाले की, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ज्या पद्धतीने भाजपच्या सरकारने हल्ला घडवला त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. राष्ट्रीय पक्षाच्या सरचिटणीस असणाऱ्या खासदारांवर जो हल्ला झाला यातून देशातील पुढचे चित्र काय असेल हे स्पष्ट झाले आहे. जे विरोधक आमच्याविरोधात लढतील त्यांना आम्ही रस्त्यावर संपवू हा इशारा जर भाजप देऊ इच्छित असेल तर देशातील जनता तुमच्याविरोधात लढण्यास तयार आहे. आसामध्येसुद्धा हेच सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये जे विष पेरताय यात त्यांचाच बळी गेल्याशिवाय राहणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर