ब्रेकिंग न्यूज
Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार
SP News Maregaon

लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल:म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जर पोलिसांचा वापर गुन्हेगारांना वठणीवर आणण्याऐवजी केवळ स्वतःचं राजकारण सरळ करण्यासाठी केला, तर गुन्हेगारांची पोलिसांना शिवीगाळ करण्याची आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्याची हिंमत का होणार नाही?” असा थेट आणि अत्यंत कडक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला विचारला आहे. लातूरमधील पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या गुन्हेगारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत रोहित पवारांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचा आरोप केला आहे. लातूरमधील व्हिडिओचा दाखला रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांशी अत्यंत उद्धटपणे वर्तन करताना, शिवीगाळ करताना आणि हुज्जत घालताना दिसत आहेत. या व्हिडिओचा दाखला देत रोहित पवार म्हणाले की, लातूरमधील या धक्कादायक व्हिडिओमध्ये जे दिसतंय, ते अत्यंत चिंताजनक आहे. राजकारण्यांच्या वरदहस्तामुळेच आज गुन्हेगारांचे धाडस पोलिसांवर हात टाकण्याइतके वाढले आहे. पोलीस प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप थांबवा! राज्य सरकारवर हल्ला चढवताना रोहित पवार पुढे म्हणाले, “सध्याच्या सरकारने आतातरी जागे होण्याची गरज आहे. पोलिसांच्या दैनंदिन कामात आणि तपासात चालणारा राजकीय हस्तक्षेप तात्काळ थांबवला पाहिजे. पोलिसांना त्यांचे काम पूर्ण स्वातंत्र्याने करू दिले, तरच राज्यात कायद्याचे राज्य राहील.” गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही आणि सरकार फक्त स्वतःचे राजकीय हित पाहत असल्याचा आरोप करत त्यांनी गृहविभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे ही वाचा.. उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द:भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात; परीक्षा परिषदेचा निर्णय- फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क लागणार नाहीत
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर