ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

हिंगोली-वाशीम मार्गावर पोलिसांचा छापा:कारसह 7.38 लाखांचा गुटखा जप्त, दोघांवर बासंबा ठाण्यात गुन्हा दाखल

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली ते वाशीम मार्गावर बासंबा पाटीजवळ पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या पथकाने शनिवारी ता. 30 छापा टाकून एका कार सह 7.38 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून दररोज अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्यावर छापे टाकले जात आहेत. दरम्यान, हिंगोली ते वाशीम मार्गावर एका कारमध्ये गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव, धनंजय क्षिरसागर, नितीन गोरे, शिवाजी इंगोले यांच्या पथकाने शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका कारची तपासणी केली. यावेळी कारमधील पोत्यात गुटखा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारमधील डीबी सिग्नेचर फिनेस्ट पानमसाला, रजनीगंधा पान मसाला, एम सेन्टेड तंबाखू, आरएमडी पान मसाला या गुटख्याची पोती जप्त केली. या शिवाय एक मोबाईल व कार असा 7.38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार संदीप जाधव यांच्या तक्रारीवरून बासंबा पोलिसांनी सागर इंदोरीया, श्रध्दा जैस्वाल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार, संतोष वाढोरे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर