ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

आई रागावल्याने पाच भावंडे घरातून पळाली:पुणे पोलिसांनी तात्काळ घेतला शोध, मुले पुन्हा पालकांच्या ताब्यात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आई रागावत असल्याने पाच भावंडांनी घरातून पलायन केल्याची धक्कादायक घटना मांजरी भागात घडली. पैसे संपल्यानंतर मुले स्वारगेट बसस्थानकात थांबली होती. त्यानंतर पालकांना याबाबतची माहिती मिळाली. पोलीस आणि पालकांनी मुलांना सुखरूप ताब्यात घेतले. अचानक एकाच घरातील पाच मुले गायब झाल्याने खळबळ उडाली होती. मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या आईने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे आई-वडील सिंहगड रस्ता परिसरात राहतात. ते मोलमजुरी करतात. फिर्यादी महिलेची नणंद हडपसरमधील मांजरी भागात राहते. उन्हाळी सुट्टीनिमित्त फिर्यादी महिलेच्या तीन मुली आणि दोन मुले मांजरी परिसरात आली होती. आई रागावत असल्याने मुलांनी घरातून पसार होण्याचे ठरविले. वसतिगृहात शिकून आपण मोठे होऊ, असे मुलांनी ठरविले. मुले रिक्षाने स्वारगेट बसस्थानकात आले. स्वारगेट बसस्थानकात आल्यानंतर त्यांच्याकडील पैसे संपले होते. त्यामुळे भीती वाटल्याने बसस्थानकातील एका व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरुन त्यांनी आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. स्वारगेट बस स्थानकात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुले बेपत्ता झाल्यानंतर आई-वडील मांजरी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मुलांनी संपर्क साधल्यानंतर आई-वडील पोलिसांसह स्वारगेट बसस्थानकात पोहोचले. त्यानंतर बाल कल्याण समितीकडे पोलिसांनी नेले. समितीने मुलांकडे विचारणा केली. आई-वडिलांकडून कोणताही त्रास होत नसल्याचे मुलांनी सांगितले. त्यानंतर मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर