ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

सेनगाव जवळ पिकअप वाहनाची दुचाकी वाहनाचा धडक:वरुड चक्रपाणच्या दोन शिक्षकाचा मृत्यू, सेनगाव पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सेनगाव शहराजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. 30 रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण या गावातील रहिवासी असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूड चक्रपाण येथील शिक्षक संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे शनिवारी जनगणनाचे कर्तव्य पार पाडून रिसोड येथे पाहुण्यांकडे भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पाहूुण्यांना भेटून ते दुचाकी वाहनाने परत सेनगावकडे निघाले होते. रात्री सुमारे आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुचाकी वाहन सेनगाव शहराजवळ आले असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील, रवीकिरण खंदारे, जमादार परमेश्‍वर क्षिरसागर, सुरुदुसे, अंभोरे, अशोक धमणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गजानन व संतोष यांना तातडीने सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र त्यांच्या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत असल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरूड चक्रपाण येथील गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. दोघांच्या मृतदेहावर सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे वरुड चक्रपाण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान,अपघातानंतर पिकअप चालक पिकअप घटनास्थळी सोडून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर