ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पिंपरीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?:शरद पवार गटाच्या शहाराध्यक्षांनी घेतली अजित पवारांची भेट, काय म्हणाले तुषार कामठे?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकीकडे मुंबईत महायुतीत तणाव असतानाच, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांची बंद दाराआड भेट घेऊन, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना तुषार कामठे यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर भाजपविरोधात लढू शकणाऱ्या शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांच्या पक्षांना सोबत घेण्याचे अधिकार आम्हाला वरिष्ठांनी दिले आहेत. भ्रष्टाचारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढणे गरजेचे आहे. हाच प्रस्ताव घेऊन मी दादांकडे गेलो होतो. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत लढणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर, कामठे यांच्या या प्रस्तावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेतही अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत मुंबईतील किमान 50 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि भाजप युतीत लढणार असल्याचे जाहीर केले असले, तरी अजित पवारांचा गट महायुतीत राहणार की नाही, याचा अंतिम निर्णय खुद्द अजित पवारच घेणार आहेत. पुण्यातील तब्बल 12 तासांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर अजित पवार मुंबईकडे रवाना झाले असून, ते पिंपरी-चिंचवडबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर