ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

गारपीट, वादळी पावसामुळे मोर्शी, भातकुलीत नुकसान:घराची भिंत पडली, वीजेचा खांब वाकला, टीनपत्रेही उडाली‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शुक्रवारी दुपारनंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्याच्या भातकुली व मोर्शी तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेतीसोबतच राहत्या घरांना फटका बसला. नागरिकांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. भातकुलीत काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली. काही घरांच्या भिंतीही पडल्या. मोर्शीत वादळी पावसासोबत गारपीट झाली. शेतीपिकांचे नुकसान झाले. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काही भागात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. परिणामी विजेच्या तारा तुटल्या. प्रवाह खंडित झाला. या खंडित प्रवाहामुळे अनेक भागात उशीरा रात्रीपर्यंत काळोख होता. गरमीचे साम्राज्य होते. भातकुली – शुक्रवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमारास भातकुली शहर व परिसराला चक्रीवादळ, गारपीट, पावसाचा जोरदार फटका बसला. मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या विद्युत तारा व विजेच्या खांबांवर पडल्या. खांब वाकले. शहरातील शांतीनगरलगत असलेल्या गौरक्षणातील टिनपत्रे उडून आल्यामुळे शांतीनगरातील अनेक घरांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. शहरातील रस्त्यावर पडलेली झाडे व फांद्या उचलण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरण कंपनीकडूनही खांब व तारांवर पडलेल्या फांद्या हटवण्यात येत आहेत. मोर्शीतील दाभेरी शेतशिवारात गारपीट मोर्शी – तालुक्यातील दाभेरी शेतशिवारात दुपारी तीनच्या सुमारास गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा सुटला. खेड फाटा ते खेड गावाच्या रस्त्यावरील झाडे कोलमडली. वाहतूक विस्कळीत झाली. काही शेतकऱ्यांच्या झोपड्यांवरील टीनपत्रे उडाली. दरम्यान दाभेरी ते तळेगाव परिसरात तुरीच्या दाण्यापेक्षा मोठी गार कोसळली. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा कहर सुरू होता. याच काळात काही शेतकऱ्यांच्या शेतातील झोपडींवरील टीनपत्रे उडाली. रखवालदारांचा संसार उघड्यावर आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर