ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

माजी मंत्री तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश:राहुरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राहुरी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राहुरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. मुंबईतील मुख्य सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे यांनी जाहीर प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी पक्ष नेतृत्वासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे गटनेते प्रा. राम शिंदे आणि पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले. पक्ष आगामी काळात जी काही जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. या नवीन इनिंगमुळे राहुरी तालुक्यातील प्रलंबित विकासाच्या प्रश्नांना आता खऱ्या अर्थाने गती मिळेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नपुरे यांच्या या राजकीय भूमिकेमुळे राहुरी आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. हा डाव यशस्वी ठरल्यास राहुरी तालुक्याला एकाच वेळी दोन आमदार मिळतील. दोन आमदार असल्यामुळे तालुक्याचा रेंगाळलेला विकास आता बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल, असे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत. फटाके वाजवत कमळाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला. विखेंना साधावे लागणार कर्डिले-तनपुरे यांचे संतुलन या नव्या राजकीय भूकंपाचे पडसाद तालुक्याच्या आगामी सत्ताकेंद्रांवर पडणार आहेत. तालुक्यातील सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता भाजपची ताकद दुपटीने वाढणार आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याचे नेते मंत्री विखे पाटील यांना आता आमदार अक्षय कर्डिले यांच्यासोबतच तनपुरे यांनाही सोबत घेऊन अंतर्गत राजकीय समतोल साधावा लागेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर