ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

उलगडा; काजल इंगळेचा मारेकरी निघाला तिचा सख्खा मावस भाऊच:30 रुपयांचे पेट्रोल अन् आगपेटीने आरोपी सापडला जाळ्यात‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तपोवन परिसरातील जंगलात २ जून रोजी जळालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. दोन दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. डीएनए चाचणीच्या आधारे हा मृतदेह काजल जितेंद्र इंगळे (वय २२) या तरुणीचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर सखोल तपासानंतर गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. ११) दुपारी काजलच्या मावस भावाला अटक केली असून या गुंतागुंतीच्या हत्येचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना नवव्या दिवशी यश आले आहे. चेतन सुनील थोरात (२३, रा. तेजस विहार, राजुरा) असे पोलिसांनी पकडलेल्याचे नाव आहे. चेतन हा काजलचा सख्खा मावस भाऊ आहे. काजल इंगळे ही मूळची विश्रोळी येथील रहिवासी होती. ती काही काळ राजुरा भागात भाड्याच्या खोलीत राहत होती. मे महिन्यात तिने ती खोली सोडली होती. काजलचे जून महिन्यात लग्न होणार होते. दरम्यान काही कामानिमित्त ती ३० मे रोजी अमरावतीत आली होती. त्यादिवशी ती राजुरा येथे राहणाऱ्या मावशीकडे, म्हणजेच चेतनच्या घरी थांबली होती. ३१ मे रोजी सायंकाळी सुमारे चार ते साडेचार वाजताच्या सुमारास चेतन काजलला सोबत घेऊन तपोवन परिसरात फिरायला गेला. आयुक्तांनी केली चौकशी चेतनवर संशय बळावल्यानंतर गुन्हे शाखेने त्याची कसून चौकशी सुरू केली होती. गुरुवारी दुपारी दोन वाजता पोलिस आयुक्त राकेश ओला स्वतः गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी सुमारे अर्धा तास चेतनची सखोल चौकशी केली. यावेळी चेतनने खुनाची कबुली दिली आव्हान ठरलेल्या या हत्याकांडाचा उलगडा झाला. कारणाचा शोध सुरू या प्रकरणात काजलच्या मावस भावाला अटक करण्यात आली आहे. त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. मात्र खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. – दिनेश दहातोंडे, पीआय, गुन्हे शाखा युनिट-१. ३५० फुटेजची तपासणी घटनास्थळ जंगलात असल्याने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तरीही गुन्हे शाखेने तपोवन आणि आसपासच्या सुमारे दोन किलोमीटर परिसरातील ३५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान आरोपीने वडाळी परिसरातून पेट्रोल खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. म्हणून पोलिसांचा चेतनवर संशय जास्त बळावला चेतन हा मारेकरी असावा असा संशय सुरूवातीला पोलिसांना नव्हता. मात्र ३१ मे म्हणजेच खून झाला त्या दिवसाचे स्वत:च्याच मोबाईलमधील काही फोटो त्याने डिलीट केले होते. तसेच त्याने वडाळी भागातून बॉटलमध्ये ३० रुपयांचे पेट्रोल व आगपेटी घेतली. तसेच अन्य काही परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांच्या हातात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर