ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अधिकाऱ्यांची दुचाकीवरून प्रवास करत जलजीवनच्या कामाची पाहणी:कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना, शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचेही केले आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दुचाकी वाहनांवर प्रवास करून पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा राखण्याच्या सूूचना यंत्रणेला दिल्या आहेत. कळमनुरी तालुक्यातील माळेगाव, बिबगव्हाण, कळमनुरी, झरा, तुप्पा, नवखा व शिवणी बु. या गावांना जिल्हाधिकारी गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, संजय कुलकर्णी, विजय बोरोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे प्रश्‍न मांडले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक वितरण प्रणाली, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांतर्गत प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्वरित निराकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दप्तर तपासणीसह ई-चावडी, ई-हक्क प्रणाली, ई-फेरफार प्रकरणांची तपासणी करून ती तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. याशिवाय नागरिकांच्या निवेदनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. तसेच तीन स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. तुप्पा येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून केवळ वीज जोडणी अभावी नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर महावितरणला तात्काळ वीजजोडणी करून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले. या शिवाय माळेगाव शिवारातील जल जीवन मिशनच्या कामांची दुचाकीवर प्रवास करून पाहणी केली. यावेळी गावकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर