ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

आरोग्य भरतीत रोस्टर घोटाळा:हा नालायकपणा कुणी केला? बिंदू नामावलीत घोळ करून मागासवर्गीयांवर अन्याय, आमदार पडळकरांचा सरकारला घरचा आहेर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘गट अ’ पदांच्या भरती प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप करत ‘रोस्टर घोटाळा’ उघडकीस आणला आहे. 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या 1440 पदांच्या जाहिरातीत बिंदू नामावलीचे (रोस्टर) उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पडळकर यांच्या मते, या जाहिरातीत अनुसूचित जातीला 13 टक्के (71 जागा) आणि अनुसूचित जमातीला 7 टक्के आरक्षणानुसार केवळ 15 जागा दाखवण्यात आल्या आहेत, जी मोठी तफावत आहे. विशेष म्हणजे विमुक्त जाती (अ) आणि भटक्या जमाती (ब, क, ड) या प्रवर्गांसाठी चक्क ‘शून्य’ जागा दाखवण्यात आल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या भरती प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना पडळकर म्हणाले की, आरक्षित प्रवर्गातील मुले गुणवत्तेच्या (Merit) जोरावर खुल्या प्रवर्गात जागा मिळवत असताना, प्रशासन मात्र त्यांना आरक्षित जागेवरच दाखवून अन्याय करत आहे. यामुळे खुल्या प्रवर्गात तब्बल 864 जागा (सुमारे 60 टक्के) दाखवल्या गेल्या आहेत, जो नियमबाह्य प्रकार आहे. हा नालायकपणा कोणी केला याचा शोध घ्यायला हवा, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल शहानिशा होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली आहे. बिंदू नामावलीची योग्य तपासणी केल्याशिवाय अशा जाहिराती प्रसिद्ध करणे म्हणजे मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 3 वेळा चुका आढळल्या प्रशासकीय दिरंगाईवर टीका करताना पडळकर यांनी अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. सोलापूरच्या रोस्टर तपासणीत तीन वेळा गंभीर चुका आढळल्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, अनेक विभागांतील अधिकारी रोस्टरबाबत अजिबात गंभीर नाहीत. आरक्षणाच्या विषयावर आपण सभागृहात आणि मंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अन्यायाविरोधात आज दुपारी ते स्वतः आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर पत्र देणार आहेत. जे अधिकारी जाणीवपूर्वक अशा चुका करून बहुजन समाजातील तरुणांचे नुकसान करत आहेत, त्यांना योग्य जागा दाखवू, अशा आक्रमक शब्दांत त्यांनी आपला पवित्रा स्पष्ट केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर