ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाचा 125 जागांचा आग्रह:भाजपकडून केवळ 52 जागांचा प्रस्ताव; महायुतीत ठिणगी? शिंदे गट नाराज असल्याची चर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत 125 जागा लढवण्याचा आग्रह धरला असतानाच, भाजपने त्यांना केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. भाजपने थेट 52 जागांची यादीच शिंदेसेनेकडे सोपवल्याने जागावाटपाच्या चर्चेत सुरुवातीलाच तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. 2017 मध्ये एकसंध शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, पुढे ही संख्या 99 वर पोहोचली. पक्षात फूट पडल्यानंतर यातील 47 नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली. तसेच 2007 आणि 2012 मधील माजी नगरसेवकांचा विचार करता आपल्याकडे 100 हून अधिक माजी नगरसेवकांची फौज असल्याचा दावा शिंदे गट करत आहे. याच बळावर त्यांनी 125 जागांवर दावा केला आहे. मात्र, भाजपने केवळ 52 जागांचा प्रस्ताव देऊन शिंदेसेनेची कोंडी केली आहे. परवा दोन्ही पक्षात प्रभागनिहाय चर्चा होणार असली, तरी या प्रस्तावामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. ठाकरे बंधूंचे आव्हान आणि भाजपची रणनीती एकीकडे महायुतीत जागावाटपाचा तिढा असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मुंबईत आजही ताकद असलेल्या उद्धव ठाकरेंना (10 आमदार, 3 खासदार) साथ देण्यासाठी राज ठाकरे यांची मनसे पुढे येण्याची चिन्हे आहेत. दोन्ही पक्षांत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, जर ही युती आकाराला आली, तर मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा अभूतपूर्व सामना रंगणार आहे. तसेच 2012 आणि 2007 मध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा विचार केल्यास शिंदेसेनेकडे जवळपास 100 माजी नगरसेवकांची फौज आहे. या सगळ्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी शिंदेसेनेला 125 जागा हव्या आहेत. पण भाजपने थेट 52 जागांची यादी देत शिंदेसेनेची कोंडी केली आहे. विद्यमान नगरसेवकाची जागा संबंधित पक्षच लढणार राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक तिढा सुटल्याचे चित्र आहे. या बैठकीत “ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यमान नगरसेवक, ती जागा त्या पक्षाला,” या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर काही जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. हेही वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर