ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सोलापुरात 11 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार:धमकीमुळे पीडित बालक दहशतीत, आरोपीला 3 दिवसांची पोलिस कोठडी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. खेळणाऱ्या एका 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला बळजबरीने घरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सिद्धाराम उर्फ सिद्धया सलगर याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 मे रोजी पीडित बालक आपल्या घरासमोर खेळत होता. यावेळी आरोपी सिद्धाराम याने त्याला गाठून बळजबरीने स्वतःच्या घरात ओढत नेले. तिथे त्याने मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. सुदैवाने, एका महिलेच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने आरडाओरड केल्यामुळे घाबरलेल्या आरोपीने मुलाला सोडले. बालकाला दिली धमकी घटनेनंतर आरोपीने हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी बालकाला दिली होती. या भीतीपोटी पीडित मुलाने अनेक दिवस कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शी महिलेने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हे भीषण वास्तव उघड झाले. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड करत आहेत. पुण्यातही 3 वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरला दुसरीकडे पुण्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यातील दक्षिण महाळुंगे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तीन वर्षांच्या बालकावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून ठेवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने प्रथम बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर गळा चिरून त्याची हत्या केली. बालकाच्या शरीरावर जखमा आणि गळा चिरल्याचे दिसून आले, ज्यामुळे ही हत्या क्रूरपणे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे बालक घरातून बेपत्ता झाल्यापासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दक्षिण महाळुंगे येथील एका निर्जन स्थळी बालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर