ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

334 कोटींच्या रस्ते कामात सिमेंटऐवजी वापरली ‘राख’?:भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात भ्रष्टाचार! कंत्राटदारावर कारवाईची मागणी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 34 कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी चक्क ‘फ्लाय ॲश’ (कोळशाची राख) आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विकासकामांच्या नावाखाली कंत्राटदार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या संगनमताने जनतेच्या कराच्या पैशांची कशा प्रकारे उधळपट्टी केली जाते, याचा हा एक धक्कादायक नमुना असून या प्रकारामुळे रस्ते बांधकामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखांदूर तालुक्यातील कराडला ते ढोलसर, मांडळ ते बोथली आणि मांडळ ते सरांडी या तीन महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 334 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सध्या प्रगतीपथावर असलेली ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून कंत्राटदार केवळ स्वतःचा खिसा भरण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांसह राजकीय नेत्यांनी केला आहे. कंत्राटदारावर कडक कारवाई करावी- शिवसेना ठाकरे गट या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे यांनी कंत्राटदार आणि संबंधित प्रशासकीय विभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी राखेचा आणि दर्जेदार गिट्टीऐवजी वाळू मिश्रित चुऱ्याचा वापर होत असल्याचे त्यांनी उघडकीस आणले आहे. या निकृष्ट कामाचा रीतसर पंचनामा करून ढोरे यांनी संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आरोपांवर प्राशनाकडून प्रतिक्रिया दरम्यान, या गंभीर आरोपांवर उपविभागीय अभियंता विजया सावरकर यांनी म्हटले की, रस्ता बांधकामाच्या कामात कुठलीही अनियमितता नसून अंदाजपत्रक नुसारच काम योग्य पद्धतीने होत आहे. रस्ता बांधकामासाठी जो डब्ल्यूएमएम थर गरजेचा आहे त्यानुसार काम ग्रेडेशन नुसार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना सावरकर म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता बांधकाम असल्याने राज्य गुणवत्ता निरीक्षक हे राज्यातील कुठूनही येतात. रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता तपासात आणि हे तपासणी करत असतानाअंदाजपत्रकानुसार लेयरनुसार तपासणी करत असल्याने त्यात कुठलाही अपहार होऊ नये, या दृष्टीने आम्ही त्यावर नियंत्रण ठेवून आहोत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी फ्लॅशची राख होती. मात्र, ती कंत्राटदाराने स्वतःच्या कुठल्यातरी कामासाठी आणली असावी, असे मोघम उत्तर सावरकर यांनी दिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर