ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

इर्विनमध्ये पाणी शिरल्याने जबाबदारांना निलंबित करा:शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख हरमकर यांची मागणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) गरीब रुग्णांचे देवस्थानच आहे. येथे पावसाची पाणी शिरून रुग्णांचे जे हाल झाले त्यासाठी जबाबदार असलेले जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) व महानगर पालिका आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी गुरुवार २५ रोजी जिल्हाधिकाऱ्या दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील हजारो गरीब रुग्णांचा जीवनाधार असलेल्या इर्विन रुग्णालयाची स्थिती फारच दयनीय झाली आहे. येथे वारंवार रुग्णांच्या जीवाशी खेळ होतो. त्यामुळे केवळ मुसळधार पावसाचे कारण पुढे करून अक्ष्यम्य गुन्ह्यावर कोणालाही पांघरून घालता येणार नाही. ही संपुर्ण मानवनिर्मित आपत्ती असून यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचा निष्काळजीपणा तसेच मनपा आयुक्तांचा नियोजनशुन्य कारभार जबाबदार आहे. दरवर्षी इर्विनमध्ये पावसाचे पाणी शिरते याची जाण असतानाही सीएस यांनी बचावासाठी कोणतीही पूर्वतयारी केली नाही. अति दक्षता विभाग, बाह्य रुग्ण विभाग, सीटी स्कॅन विभागात पाणी शिरणे म्हणजे रुग्णांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखे आहे. अगदी अक्ष्यम्य गुन्हा आहे. पाणी रुणालयात शिरल्यानंतरही ते बाहेर काढण्याची व्यवस्था न करणे तसेच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतानाही त्यावर परिणामकारक उपाययोजना न करणे ही फारच गंभीर बाब असल्याचे निवेदनात प्रवीण हरमकर यांनी नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतिने उपजिल्हाधिकारी ज्ञानेश घ्यार यांनी शिवसेना उबठाचे निवेदन स्वीकारले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर