ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

प्रेमप्रकरणातून 21 वर्षीय तरुणीची आत्महत्या:दुसऱ्या तरुणीशी मैत्री केल्याने टोकाचे पाऊल, तरुणावर गुन्हा दाखल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रेमप्रकरणातून एका 21 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठोंबरे (वय 23, रा. कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुणी वारजे माळवाडी येथे राहत होती. आरोपी राज ठोंबरे आणि मयत तरुणीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी राजने दुसऱ्या एका तरुणीशी मैत्री केल्यानंतर मयत तरुणीला टाळण्यास सुरुवात केली होती. यावरून तरुणीने त्याला जाब विचारला असता, त्याने तिच्याशी भांडणे करून मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणीने 4 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, तरुणीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राज ठोंबरेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भांबेरे करत आहेत. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची चार लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका 54 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहगाव परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम करण्याची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. सुरुवातीला महिलेला एक काम दिले. त्यानंतर महिलेला या कामात पैसे गुंतविल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात चार लाख चार हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेल परतावा दिला नाही. पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. दरम्यान, क्रेडीट कार्डचे कुपन देण्याचे आमिष दाखवून खराडी भागातील एका तरुणीची सायबर चोरट्यांनी तीन लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस पालेकर तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर