ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे निर्देश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पूरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागांत तत्काळ मदत पोहोचेल. यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. यासाठी सर्व स्तरांवरील संपर्क यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि बचाव पथके २४ तास कार्यान्वित ठेवून जिल्हा प्रशासनाने नेहमी सतर्क राहावे. असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिले. आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदत मिळण्यासाठी नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक सर्व माध्यमांद्वारे जाहीर करावेत. असेही त्यांनी सांगितले.​विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागातील मान्सून पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला अपर आयुक्त संजय जाधव, कृषी सहसंचालक गणेश घोरपडे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.पावसाळ्यात पूरबाधित किंवा संपर्क तुटणाऱ्या गावांतील नागरिकांसाठी उंच ठिकाणी निवारा व्यवस्था करावी. भोजन व्यवस्था करावी. धान्य आणि औषधींचा साठा आधीच करून ठेवावा. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत. यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासावी. सर्पदंश व विंचूदंशावरील पुरेशी औषधे व इंजेक्शन्स प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवावीत. दुर्गम भागातील गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी आरोग्य केंद्रांनी उपाययोजना कराव्यात. एसडीआरएफ, एनडीआरएफची बचाव पथके स्थापन करावीत. अवकाळी पाऊस किंवा वादळानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत करण्यासाठी महावितरणने नियोजन करावे. धरणांमधून पाणी सोडताना संबंधित तहसीलदार, पोलिस आणि नियंत्रण कक्षाला २४ तास आधी कळवणे बंधनकारक राहील. नदीकाठावरील धोकादायक गावांमध्ये (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करून पूर प्रतिबंधक समित्या स्थापन कराव्यात. दुर्गम भागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करावी ​दुर्गम व संपर्कहीन भागात आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘बिनतारी संदेश यंत्रणा’ (वायरलेस सिस्टीम) कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून मिळणारे इशारे नागरिकांपर्यंत जलद गतीने पोहोचवावेत. तसेच वीज पडण्याचे संकेत देणाऱ्या ”दामिनी ॲप”चा वापर वाढवण्याबाबत जनजागृती करावी. ​शेवटी, विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, संभाव्य पूरबाधित गावे, हवामान अंदाज केंद्रे, औषध साठा, खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. विभागांना आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे आदेश दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर