ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

विधान परिषदेत घोडेबाजार होणार:भाजपचे नगरसेवक फुटणार, काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा संकेत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांनी लोंढे यांच्या विजयाचा दावा करताना, भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. डॉ. नितीन राऊत यांनी निवडणुकीतील राजकीय गणितांवर बोलताना म्हटले की, “निवडणुकीची अंतर्गत बेरीज-वजाबाकी पूर्ण झाली आहे.” हा विषय सार्वजनिकपणे सांगण्याचा नसला तरी, मतदानानंतर भाजपचे किती नगरसेवक फोडले हे सर्वांच्या लक्षात येईल, असा दावा त्यांनी केला. आमदार विकास ठाकरे यांनीही राऊत यांच्या दाव्याला दुजोरा दिला. त्यांच्या मते, भाजपकडे कागदावर बहुमत असले तरी, अतुल लोंढे १०० हून अधिक मतांनी निवडून येतील. गुप्त मतदान पद्धतीमुळे भाजपची मते फोडण्याची तयारी लोंढे यांनी स्वतः केली आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. लोंढे हे योग्य उमेदवार, उत्तम प्रवक्ते आणि बहुजन समाजातील मोठा चेहरा असल्याचे काँग्रेस नेत्यांनी नमूद केले. काँग्रेसने विचारपूर्वक त्यांना रिंगणात उतरवले असून, त्यांच्या विजयाची पूर्ण संधी असल्याचे म्हटले आहे. डॉ. नितीन राऊत यांच्यासारखे अनुभवी नेते या निवडणुकीची धुरा सांभाळत असल्याने ही जागा काँग्रेस जिंकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, डॉ. राऊत यांनी विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेवरही भाष्य केले. काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, परंतु सध्याच्या भाजप प्रणित सरकारची तशी मानसिकता दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. हे सरकार केवळ घोषणाबाजी करत असून, लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास हिरावून घेणारे असल्याचे राऊत म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर