ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अधिकमासानिमित्त अनोखा उपक्रम:चोपड्यातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी एकाच वेळी सुटल्या बसेस, 410 भाविक यात्रेसाठी रवाना

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चोपडा शहर व तालुक्याच्या धार्मिक इतिहासात सुवर्णक्षण ठरावा असा उपक्रम शुक्रवारी सकाळी पार पडला. पंकज समूहाच्या वतीने तब्बल 410भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आरामदायी बसेसमधून रवाना करण्यात आले. चोपड्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रितपणे पंढरपूर यात्रेसाठी निघाल्याने हा उपक्रम विशेष ठरला. अधिकमासानिमित्त पंकज विद्यालयात पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भागवत पारायण, सात दिवसांचा कीर्तन सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांनी प्रतिसाद दिला. त्याच वेळी भाविकांनी पंढरपूर दर्शनासाठी सामूहिक यात्रेचे आयोजन करण्याची विनंती डॉ. बोरोले यांच्याकडे केली होती. त्या विनंतीला प्रतिसाद देत पंकज समूहाने अवघ्या काही दिवसांत संपूर्ण नियोजन करून 410 भाविकांसाठी पंढरपूर यात्रेचे आयोजन केले. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पंकज विद्यालयाच्या प्रांगणात श्री गणेश ट्रॅव्हल्स, अडावद यांच्या आरामदायी बसेसचे विधिवत पूजन करण्यात आले. डॉ. सुरेश बोरोले, हेमलता बोरोले व दिपाली बोरोले यांच्या हस्ते श्रीफळ वाहून यात्रेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्यामकांत पाटील, कवी रमेश जे. पाटील, माजी सरपंच पंडित पाटील, काशिनाथ महाजन, व्ही. आर. पाटील, एम. व्ही. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व माता-भगिनी उपस्थित होत्या. ही यात्रा शनिशिंगणापूर मार्गे पंढरपूरला जाणार असून 26 जून रोजी रात्री पंढरपूर येथे मुक्काम करण्यात येणार आहे. 27 जून रोजी सर्व भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. तीन दिवसांच्या या यात्रेत चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण, मुक्काम, प्रवास तसेच भाविकांच्या सर्व प्रकारच्या देखभालीची जबाबदारी पंकज समूहाने स्वीकारली आहे.या यात्रेत चोपडा शहरातील विविध कॉलनींसह तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. तसेच आडगाव ता चोपडा व धरणगाव तालुक्यातील साळवा येथील भाविकही मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले आहेत. डॉ. सुरेश बोरोले यांच्या नेतृत्वाखाली पंकज समूहाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविले आहेत. समाजोपयोगी कार्यक्रमांवर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करून समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे या पंढरपूर यात्रेचे आयोजनही समाजात कौतुकाचा विषय ठरत आहे.

“चोपडा शहरातील नागरिकांनी आमच्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. त्या प्रेमाची परतफेड करण्याचा पंकज समूह सातत्याने प्रयत्न करत असतो. आमच्या कुटुंबातील स्नुषा प्रतिभा बोरोले यांचे १ मे रोजी केदारनाथ यात्रेदरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभावी या भावनेतून भागवत कथा, कीर्तन सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला घेऊन जाण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. अशा सेवाभावी कार्याची प्रेरणा आणि बुद्धी भगवंतच देत असतो.” डॉ. सुरेश पंडित बोरोले, संस्थापक अध्यक्ष, पंकज समूह, चोपडा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर