ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

दर्यापूर तालुक्यामध्ये बारावी बोर्डाचा निकाल ८८.८८ टक्के:हर्षीका कलंत्रीने विज्ञान शाखेत मिळवले ९०.१७ टक्के गुण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर अमरावती येथे शनिवारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी असा जल्लोष साजरा केला. छायाचित्र ः अक्षय नागापुरे, अमरावती. प्रतिनिधी | दर्यापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालात शहरातील एकवीरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी हर्षीका कंलत्री हिने ६०० पैकी ५४१ गुण (९०.१७ टक्के) मिळवत उत्तम यश संपादन केले आहे. याचवेळी भक्ती झंवर (८९.५० टक्के), मंजिरी तळोकार (८९.३४ टक्के), तर नंदिनी भट्टड व तनिष्का काननुगो या दोघींनी समान ८९ टक्के गुण मिळवले आहेत. एकविरा कॉलेजचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून ८७ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शहरातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९.१६ टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून श्रद्धा नांदूरकर हिने ८९.१७ टक्के गुण मिळवले असून, तिच्या पाठोपाठ अक्षदा टोळे हिने ७०.१७ टक्के तर संचित गुल्हाने व खुशी गोलाईत यांनी चांगले गुण मिळवले आहे.प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत मंथन कातळे (८६.३३ टक्के), डिंपल इंगळे (८२.३३ टक्के), तर संस्कृती पेढेकर यांनीही गुणवत्तापुर्ण यश संपादन केले आहे. प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयाचा कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी शाखांचा एकूण निकाल ९६.४३ टक्के लागला आहे. एकूण ३३५ विद्यार्थ्यांपैकी २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयातून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे एकूण १७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ८८.८८ टक्के, वाणिज्य शाखेचा ८७.५३ टक्के, तर कला शाखेचा ८०.४५ टक्के लागला असून एकूण निकाल ८४.११ टक्के आहे. उ. ना. लोणकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कला व वाणिज्य शाखेचा निकाल ५२.३२ टक्के लागला आहे. येथे एकूण ११५ विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.नगर परिषदेच्या मौलाना आझाद उर्दू विज्ञान हायस्कूलचा निकाल ८८.१४ टक्के, तर राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तोंगलाबादचा निकाल ९१.८३ टक्के लागला आहे. विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, वर्गशिक्षक, विषय शिक्षक, संस्था पदाधिकारी तसेच आई-वडिलांना दिले आहे. बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. दर्यापूर तालुक्यातून यावर्षी २,२७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २,०२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८८.८८ टक्के लागला आहे. शहरातील एकविरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचा निकाल १०० टक्के लागला असून ग्रामीण भागातील शहीद एस. जावरकर उच्च महाविद्यालय, सासन-रामापूर, महर्षी वाल्मिकी ज्युनिअर कॉलेज, सामदा आणि काशीबाई अग्रवाल विद्यालय, येवदा या सर्व संस्थांचाही निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच तालुक्यातील ११ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. तालुक्यातील २ हजार २४ विद्यार्थी झाले उत्तीर्ण

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर