ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मंत्र्यांनी लक्षवेधीवर बोलताना अभ्यास करून यावे:नुसते बघतो, बैठक लावतो, असे म्हणून चालत नाही; मुनगंटीवारांनी उडवली मंत्र्यांची भंबेरी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देण्याच्या मुद्यावरून अन्न व नागरी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना अक्षरशः फैलावर घेतले. लक्षवेधीवर बोलताना मंत्र्यांनी अभ्यास करून यायला हवे. केवळ बघतो, बैठक लावतो, असे सांगून चालत नाही, असे ते या प्रकरणी मंत्री कदम यांचे कान टोचत म्हणाले. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्यावर लक्षवेधी मांडण्यात आली. या प्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर त्यांना सत्ताधारी आमदारांचीही साथ मिळाली. यात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. त्यांनी लक्षवेधीला थातूर मातूर उत्तर देण्याच्या मुद्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री योगेश कदम यांना चांगलेच खडेबोल सुनावले. लक्षवेधीवर बोलताना मंत्र्यांनी अभ्यास करून यायला हवे. केवळ बघतो, बैठक लावतो असे बोलून चालत नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील तब्बल 7 लाख शेतकरी धानाच्या बोनसच्या घोषणेची वाट पाहत आहेत. 15 डिसेंबर 2025 रोजी मी धान उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी या प्रकरणी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते त्यामुळे जानेवारीत यासंबंधीचा जीआर निघेल अशी अपेक्षा होती. पण सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे कारण पुढे करण्यात आले. ही निवडणूक संपली. त्यानंतरही बोनसचा जीआर निघाला नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी 25 डिसेंबर रोजी स्पष्ट आदेश दिले असतानाही माननीय राज्यमंत्र्यांचा अन्न व नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपलेला आहे. ही अधिवेशनातील पहिलीच लक्षवेधी होती. अधिवेशनात पहिलाच निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा होणे अपेक्षित होते. राज्यमंत्र्यांकडून धान उत्पादकांच्या बोनसविषयी ठोस व नेमक्या उत्तराची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली, असे ते म्हणाले. योगेश कदम यांनी काय दिले उत्तर? सुधीर मुनगंटीवार यांचा हा रोष पाहून योगेश कदम यांनी धान उत्पादकांना गत 3 वर्षांत देण्यात आलेल्या बोनसची आकडेवारी सभागृहाच्या पटलावर सादर केली. ते म्हणाले, 2022-23 मध्ये बोनस म्हणून आपण 823 कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता. त्यानंतर 2023-24 मध्ये आपण 1378 कोटी दिले. 2024-25 मध्ये 1628 कोटींचा निधी यासाठी जारी करण्यात आला. नोंदणीकृत शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. पण ही रक्कम व धान खरेदीच्या गुणोत्तराचे प्रमाण याची फेरतपासणी होण्याची गरजेची आहे, असे कदम म्हणाले. ..अन् सुधीर मुनगंटीवारांचा पारा चढला योगेश कदम यांचे हे उत्तर ऐकूण सुधीर मुनगंटीवर चांगलेच संतापले. ते म्हणाले, धान उत्पादक शेतकरी सर्वात गरीब शेतकरी असतो. अनुदानाची रक्कम वाढल्यामुळे निधीचा आकडा वाढला. धान विक्री होवो अथवा न होवो. पोर्टलमध्ये नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळालेच पाहिजे. पण धानाचा बोनस देण्याची वेळ येते तेव्हा चर्चा व मंथन सुरू होते, हे योग्य नाही. विधानसभेत लक्षवेधी असली की उत्तर देण्यासाठी मंत्री महोदयांनी अभ्यास करून येण्याची गरज आहे. लक्षवेधीवर अशा प्रकारे उत्तर देणे हा संविधानाचा अपमान आहे. 25 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही अन्न व नागरी पुरवठा विभागाने या प्रकरणी कोणतीही तयारी केली नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. हे ही वाचा… महाराष्ट्रात कुणाला घाबरायचे नाही का?:कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी ‘ठोको विधेयक’ आणावे लागेल, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत संतापले
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेतील कामकाजात होणाऱ्या दिरंगाईच्या मुद्यावर कामचुकार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. या प्रकरणी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली. तसेच विधान मंडळाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत विधीमंडळाचे कामकाजाचे लवकरच डिजिटलायझेशन होणार असल्याचे स्पष्ट केले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर