ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

अधिकमासानिमित्त तिर्थाटन:प्रवाशांची गर्दी वाढली; रेल्वेत आरक्षण मिळेना,एसटीतही गर्दी वाढली, महिलांना 50 टक्के सवलतीने संख्या जास्त‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उन्हाळ्यात बहुतेक जण पर्यटनासाठी जात असल्याने रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नाही. त्यातच अधिक मासानिमित्त (पुरुषोत्तम मास) तिर्थाटनाला जाणाऱ्यांचीही भर पडल्यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले आहे. सामान्य श्रेणीत तर पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, अशी प्रचंड गर्दी आहे. अशा प्रवासात गैरसोय होत असली तरी प्रवासी एका रात्रीचा त्रास आहे, असे म्हणत अगदी सहज ती सहन करीत आहेत. एसटी बसेसची स्थिती काही वेगळी नाही. यातही चांगलीच गर्दी वाढली असून, महिला प्रवाशांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के सवलत मिळत असल्यामुळे त्यांची तर विशेष गर्दी दिसून येत आहे. संतनगरी शेगावला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. यासोबतच त्र्यंबकेश्वर नाशिक, द्वारका, जगन्नाथ पुरी, कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, वृंदावन, उज्जैन, वाराणसी या तीर्थस्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढल्याने येथे जाण्यासाठी आरक्षण खिडकीवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. बहुतेकांना आरक्षणही मिळत नसल्याने ते दुप्पट रक्कम मोजून तत्काळ आरक्षणाचा पर्याय शोधत असले तरी तत्काळ आरक्षणही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे भाविक प्रवाशांना खासगी वाहन किंवा उर्वरित. पान ४ ^सध्या पर्यटनाचा हंगाम असून, नातेवाईकांकडे जाण्यासह विविध पर्यटन स्थळे बघण्यासाठी प्रवाशांनी दोन ते तीन महिने आधीच आरक्षण करून ठेवले आहे. यापैकी बहुतेक तिकीटे ही कायम राहत असल्यामुळे ऐनवेळी तत्काळ आरक्षणही मिळेनासे झाले आहे. कारण, केवळ काही मिनिटांतच तत्काळ तिकीटेही संपत आहेत. -एम.एस.लोहकरे, स्टेशन प्रबंधक, अमरावती. दोन्ही हंगाम एकाचवेळी आल्यामुळे गर्दी वाढली उन्हाळा हा पर्यटनाचा हंगाम असून,दर तीन वर्षांनी येणाराअधिक मास या वर्षी मे-जून महिन्यातच आल्यामुळे रेल्वेसह एसटी बसमध्ये पर्यटकांसह भाविकांची गर्दी वाढली आहे. या संधीचा फायदा घेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवली तरी प्रवाशांची गर्दी काही कमी झाली नाही. रेल्वेने तर आधीच विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. तरीही सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रतिक्षा यादीच दिसून येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर