ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मोदी यंत्रणेच्या बळावर आलेले पंतप्रधान:भारतीय जहाजावर हल्ला झाला तरी पंतप्रधान गप्प का?, शहांनी त्यांच्यावर उपकार करणाऱ्यांचेच पक्ष फोडले- राऊत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमित शहा यांच्यावर ज्या पक्षाने उपकार केले आहेत त्यांचा पक्ष फोडण्याचे काम अमित शहा यांनी केले हे कपट कारस्थान नाही तर काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विक्रम केला नाही. पंडित नेहरू हे 1947 पासून 16 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मंत्री होते. तर सरदार पटेल हे त्याच काळात देशाचे गृहमंत्री होते मग ही लोकं त्यांना पण देशाचे गृहमंत्री मानत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायदामंत्री माणायला मोदी तयार नाहीत जर नेहरुंचा 4 वर्षांचा तो कालखंड त्यांना मान्य नसेल तर, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नेहरुंनी 16 वर्षांमध्ये देश उभा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजून खूप काम करायचे आहे. त्यांनी अजून काम करण्यास सुरूवात केलेली नाही. ते कट कारस्थान करण्यातच व्यस्त आहेत. नेहरुंनी हे कधी केले नाही. त्यामुळे मोदींचे भाषणं आम्ही काही गांभीर्याने घेत नाही. 2014 ला लोकांनी त्यांना निवडून दिले. 2019 आणि 2024 मध्ये जनतेने पराभूत केले पण यंत्रणेचा वापर करत ते निवडून आले. 2024 मध्ये त्यांना बहुमतच नाही. ते निवडून आलेले पंतप्रधान नाही.

शरद पवारांनी पुढाकार घ्यावा संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस देशात मजबूत झाला पाहिजे. काँग्रेसमधून गेलेल्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. या संदर्भात शरद पवारांनी पुढाकार घेत नेतृत्व केले पाहिजे. काँग्रेस विचारधारेतून बाहेर पडलेले आणि आजही काँग्रेससोबत असलेल्या पक्षांनी काँग्रेससोबत आले पाहिजे. तर जनतेच्या हिताचे काम करता येईल. ट्रम्प यांच्या विधानांना गांभीर्याने घेऊ नका संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प मोदी यांच्याबद्दल काही म्हणाले हे आम्ही ऐकले नाही. पण ट्रम्प कोणाचीही वाह वाह करतात आणि दोन दिवसानंतर वेगळी भूमिका घेतात. भारताविषयी त्यांनी काय काय म्हटले हे सर्वांना माहिती आहे. कालच ओमानमध्ये भारतीय जहाजावर हल्ले झाले अमेरिकेच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आमचे टेल टँकर बुडवले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही, हे केवळ निषेध व्यक्त करतात.

राऊतांचे ट्विट काय? संजय राऊत म्हणाले की, प्रभु श्रीराम मन से अत्यंत दुखी और व्यथित हैं… अयोध्या लौटकर क्या यही दर्दनाक दृश्य देखना था? हृदय काँप उठता है सोचकर। समझ नहीं आता, लेकिन श्रीराम आज पुकार रहे हैं… प्रेम की गहरी, करुण साद दे रहे हैं। जैसे कह रहे हों – “बेटा, आ जा..” अयोध्या एक बार जाना ही पड़ेगा, उन चोर मंडली का समाचार लेने के लिए। श्रीराम की यही इच्छा, यही पुकार प्रतीत हो रही है। हे प्रभु, आपके दुख को हम महसूस कर रहे हैं… जय श्री राम असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“अमेरिकेत कोण कोणास भेटले? संजय राऊत यांनी एक नवा फोटो पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर खोचक निशाणा साधला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली होती, असा दावा राऊत यांनी केला आहे. या कथित भेटीनंतरच दिपके भारतात परतल्याचे त्यांनी म्हटले आहे.संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजीत दिपके यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये, “अमेरिकेत कोण कोणास भेटले?” असा थेट आणि उपरोधिक सवाल उपस्थित केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर