ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

‘माझा श्वास तुमच्याकडे गहाण टाकून मुंडे साहेब गेले’:गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक; ‘एक पेड बाप के नाम’चा केला संकल्प

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आज असलेल्या स्मृती दिनानिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर भजन आणि कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भारूड गाताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले, ज्यानंतर त्यांनी गडावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही 12 वर्षे झाले तरी माझ्या वडिलांसाठी घाम गाळत आहात. मुंडे साहेबांनी काही आपल्या घरात सोन्याचे पोते आणून नव्हते ठेवले. पण मुंडे साहेबांनी आपल्या रक्तात, आपल्या धमण्यांमध्ये स्वाभिमान भरला आहे. त्यामुळे आपण मुंडे साहेबांना कधीच विसरू शकत नाही. जाती धर्माच्या सगळ्या भिंती पाडून ज्यांच्यासाठी अश्रू गाळले आजच्या दिवशी सबंध देशातल्या लोकांनी त्या मुंडे साहेबांचे आणि त्या लोकांच्या अश्रूचे आणि आमचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझा श्वास तुमच्याकडे गहाण टाकून मुंडे साहेब स्वर्गाला गेले पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जेवढे प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर करतात, तेवढे मी कर्जबाजारी होते. कारण माझा श्वास तुमच्याकडे गहाण टाकून मुंडे साहेब स्वर्गाला गेले आहेत. कारण मुंडे साहेबांना जेवढे तुम्ही प्रेम करता तेवढे तुमचे जोडे उचलण्याची क्षमता माझ्यात येते. तुमच्यासाठी कष्ट करण्याची क्षमता माझ्यामध्ये येते. मला या जीवनात तुमच्या प्रेमापेक्षा, तुमच्या सन्मानापेक्षा कुठलीच संपत्ती मोठी नाही, हे मी मुंडे साहेब आणि वैद्यनाथाची शपथ घेऊन सांगते. 2 जूनची रात्र फार फार कठीण असते पंकजा मुंडे पुढे भावनिक होत म्हणाल्या, 3 जूनचा दिवस सोपा वाटतो, पण 2 जूनची रात्र मात्र फार फार कठीण असते. मी माझी आई, प्रीतम ताई आणि माझे दोन्ही लेकरं आम्ही काल रात्री इथे बसलो होतो आईजवळ. आई सतत रडत होती, एक टर्म तरी साहेबांना मिळायला पाहिजे होती, 5 वर्ष तरी साहेब जगायला पाहिजे होते. इतके कष्ट घेतले, पायात काटे रुतले, घाबरले नाही, उन्हात फिरले, खाल्ले नाही, जेवले नाही. ज्या माणसाने सत्तेवर बघायला सगळा देश प्रतीक्षा करत होता, देवाने असे न्यायालय नाही पाहिजे होतं. पंकजा मुंडे यांनी मांडला संकल्प पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना एक संकल्प केला. त्या म्हणाल्या, आमच्या मोदीजीने सांगितले एक पेड मा के नाम. मी लवतेच. ‘एक पेड बाप के नाम’, हा माझा संकल्प असणार आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना एक रोप देणार आहे. ते रोप लावा आणि मोठे करा. मुंडे साहेबांची मान स्वर्गात उंचावली पाहिजे. माझ्याकडे पर्यावरणचे खाते आहे. मी संकल्प घेते आज, आज माझ्याकडून तुम्ही सगळ्यांनी एक एक रोप घेऊन जा. तुमच्या घरात वाढदिवस असेल, तुम्ही किमान 11 झाडे लावा, तुमच्या परिस्थितीप्रमाणे. तुमच्या घरी काही दुःख झाले असेल तेव्हा सुद्धा प्रत्येक माणसाला वृक्ष द्या. ही वृक्षाची सावली पुढच्या पिढीसाठी आहे. आज आपण प्रत्येक श्वास घेत आहोत तो श्वास आपण पुढील पिढीकडून हिरावून घेत आहोत. त्यामुळे आता आपण वृक्ष लागवड केली पाहिजे. रासायनिक खताशीवाय शेती करणार दूसरा संकल्प माझा असा आहे की, पहिला मोठा मोर्चा जर कोणी शेतकऱ्यांसाठी काढला असेल तर तो मुंडे साहेबांनी काढला होता. त्यामुळे आता रासायनिक खताशीवाय शेती करायचा संकल्प मी केला आहे. मुंडे साहेबांनी शेतात काम केले होते. आज मी शेतावर जाऊन शेत नांगरणार आहे. 12 डिसेंबरला पहाटे 5 वाजता उठून ऊसतोड करणार तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 12 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता उठून ऊसतोड कामगारांसोबत ऊस तोडीचे काम करणार आहे. मी हे कष्टकऱ्या लोकांसाठी आहे. जो दुर्बल आहे त्याची मदत करा, हे संकल्प आज मी तुमच्यासोबत सांगत आहे. जे कोणी माझ्यासोबत हे संकल्प करतील त्यांच्यावर माझी चांगली दृष्टी राहील. माझा आणखी एक संकल्प आहे, तो मी नवरात्रीत जाहीर करेल. तो संकल्प सगळ्या तुटलेल्या कड्या जोडण्यासाठी असेल. राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. तो नवरात्रीत मी तुम्हाला सांगेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर