ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नाशिकमध्ये प्रचारातून राडा:पैसे न मिळाल्याने महिलांत तुफान मारामारी, रोजंदारी बुडाल्याचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रचारासाठी महिलांना रोजंदारी देऊन विविध भागांत रॅली तसेच दौऱ्यात सहभागी करुन घेतले जात आहे. सिडकोतील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या ६५ महिलांना दुसऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने जास्त हजेरी देण्याचे आश्वासन दिले. या महिलाही दोन पैसे अधिक मिळतील या अपेक्षेने आधीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या. मात्र दिवसभर त्यांना एकाच जागी बसून ठेवण्यात आले. दुपारनंतर जाण्यास सांगितले. कोणतीही रोजंदारीही त्यांना न मिळाल्याने त्यांच्यात आणि प्रतिनिधी महिलेत आधी झटापट नंतर मारामारीच झाली. ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिला दिवसभर ताटकळत बसून राहिल्या त्या उमेदवाराने चक्क सायंकाळी फोन बंद केला होता. यातील काही महिलांना अश्रू अनावर झाले. तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला. हाताशी आलेले काम सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या मागे गेलेल्या महिलांना मात्र यातून चांगला धडा मिळाला. अशीही चर्चा दिवसभर रंगली होती. एका उमेदवाराचा प्रचाराला बोलविले. असता दुसराच उमेदवार घेवून गेला. मात्र तिथे हजेरी न मिळाल्याने त्या महिलांचे ३० हजारांचे नुकसान झाले. हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला. मात्र, महिलांनी संबंधितांविरेधात तक्रार न दिल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता. मतदारांनाच वाटण्यासाठी मागविण्यात आलेला मद्य साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापगाव शिवार त्र्यंबकेश्वर येथे जप्त केला. कारसह १७ लाख ६ हजारांचा हा मुद्देमाल असून हे मद्य दादरानगर हवेली निर्मित आहे. कारचालक हार्दीक प्रवीणभाई दप्तरी, भावेश अरुणभाई रणपुरा (दोघे रा. अहमदाबाद) असे तस्करांचे नाव आहे. अधीक्षक संतोष झगडे यांनी माहिती दिली.मनपा निवडणूकीत मतदारांना वाटप करण्याकरीता दादरा नगर हवेली निर्मित मद्याची मागणी होत आहे. इच्छुकांकडून मतदारांना वाटप करण्याकरीता मद्य मागवले जात आहे. मद्य तस्करांकडून खासगी कारमधून मद्य पुरवठा केला जात असल्याचे समजले. पथकाने सिमेवर गस्त वाढवली. सापगाव पोस्टवर विभागाचे ड पथक गस्त करत असतांना जीजे ०५ आरक्यू ७०१८ कार थांबवण्यात आली. कारची झडती घेतली असता सीट खाली ६६ बिअर बॉक्स मिळून आले. एन. एच. गोसावी, आर. एन. सोनार, एस. आर.इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. फार्म हाऊसमध्ये येणार होते मद्य त्र्यंबकेश्वरमधील एका फार्म हाऊसमध्ये हा साठा उतरवला जाणार होता. मात्र कुणाकडे याबाबत माहिती नसल्याचे दोघा तस्करांनी पथकाच्या चौकशीत सांगीतले. विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर