ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

शेतरस्त्यांची दुरावस्था; पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल:दुरूस्तीची मागणी, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांना थेट ईमेल पाठवून आणि वृत्तपत्रांमधून सातत्याने आवाज उठवूनही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बु. ते लोहारा येथील शेत रस्त्यांचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. मान्सून जूनच्या अखेरीस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची रस्त्याअभावी गैरसोय होणार आहे. प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्त्याची समस्या भेडसावते. शेतकऱ्यांना शेतमाल, अवजारे, जनावरे, वाहने शेतात ने आण करणे सोईचे होत नाही. शेतरस्त्यांवरून वादही होतात. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शेतरस्ते अडथळामुक्त व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान बाळापूर तालुक्यातील उरळ येथील शाभ घोडासकर यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण शिवराजसिंह चौहान यांना ई-मेल पाठवत शेतरस्त्याच्या दुरावस्था नमूद केली आहे, असे आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाल पोहरे यांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतरही हालचाली होतात दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रस्त्याची समस्या तातडीने न सुटल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पोहरे यांनी दिला आहे. प्रशासनाकडून आदेशाची पायमल्ली काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेत रस्ते अडथळामुक्त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. उरळ बु. येथील शेतकरी श्याम घोडस्कार, आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल पोहरे यांनी थेट केंद्रीय पातळीवर दाद मागूनही यंत्रणा हलण्यास तयार नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेत रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे कृषी उत्पादकतेला धोका निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ ख. ते लोहारा या शेतरस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. हा रस्ता या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे. मात्र गत अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जीव, उपजीविका आणि कृषी उत्पादकतेला गंभीर धोका निर्माण करत आहे. रस्त्याला खोल खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर जवळजवळ चालणेही अशक्य होते. अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर