ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पर्यावरणासाठी वृक्षलागवडीसह संवर्धन आवश्यक:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हवामान बदलाच्या आव्हानात्मक कालखंडात, यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाच्या उच्चांकाने जनतेच्या मनात वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भवितव्यासाठी पर्यावरण संवर्धन ही आजची प्राथमिक गरज बनली असून, केवळ वृक्षलागवड करून न थांबता योग्य संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. विद्यापीठाच्या कृषी पद्धती व पर्यावरण विभागाच्या वतीने त्यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. विशेषतः गावपातळीवर घरोघरी फळझाडांची लागवड केल्यास निसर्ग संरक्षणासोबतच आरोग्यदायी फळे सहज उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक आणि शारीरिक हित जोपासता येईल. विदर्भ प्रांतासाठी उपयुक्त सर्व प्रकारच्या फळझाडांची रोपे व कलमे विद्यापीठात विक्रीसाठी उपलब्ध असून, विदर्भवासीयांनी याचा लाभ घेऊन आपली निसर्ग संवर्धनाची कटिबद्धता सिद्ध करावी, असेही ते म्हणाले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. वर्षा टापरे, डॉ. शेषराव चव्हाण, डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. राजेंद्र ईसाळ, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. गोविंद जाधव आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे उपस्थित होते. आत्मनिर्भर कृषी व अकोल्याचे वैभव ‘शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी’ या संकल्पनेने सेवारत येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्य व राष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी कालसुसंगत पीक वाण, शेती उपयोगी यंत्रे आणि तंत्रज्ञान शिफारसी देऊन आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे, असे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी प्रक्षेत्रावरील नानाविध वनसंपदा तसेच पशुपक्षी संपदा राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरत असून, हे कृषी विद्यापीठ शहरासाठी एक मोठे वैभव आहे, असा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर