ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

पुणे-बंगळुरू महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक:भीषण अपघातात 2 ठार, 5 जखमी; सातारा शहराजवळील दुर्घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्टसमोरील परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील म्हसवे गावाच्या हद्दीत पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे प्रवासी घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ट्रॅव्हलरने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी वाहनातील बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने त्यांना धडकेचा मोठा फटका बसला. या दुर्घटनेत स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ (बापू) कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.जखमींची नावे मात्र समजू शकली नाही . अपघातानंतर महामार्गावर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून बचावकार्य हाती घेतले. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र सकाळच्या वेळेत काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणाची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वाहनाचा वेग, चालकाची झोप अथवा अन्य तांत्रिक कारणे याबाबत तपास केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर