ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय:हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साम-दाम-दंड-भेद’चा वापर: सपकाळांचा घणाघात
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सपकाळ म्हणाले, “सध्या ‘पैसा फेक तमाशा देख’ अशी परिस्थिती आहे. विरोधकांचे अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद करणे, उमेदवारांवर दबाव आणून अर्ज मागे घ्यायला लावणे, असे प्रकार सुरू आहेत. सत्ताधारी साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून निवडणुकीत थैमान घालत आहेत.” प्रादेशिक पक्षांचे विलीनीकरण होणार?
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या प्रश्नावर त्यांनी सूचक उत्तर दिले. भाजपविरोधात देशात काँग्रेस हाच एकमेव सक्षम प्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर अशा चर्चा रंगणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले. नाराजीच्या चर्चा म्हणजे भाजपचा कट
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांच्या हायकमांडकडे गेलेल्या तक्रारींचे सपकाळांनी खंडन केले. काँग्रेस पक्षांतर्गत कोणतीही नाराजी नाही. काँग्रेसच्या आंदोलनांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून घाबरलेल्या भाजपनेच या केवळ ‘वावड्या’ उठवल्या आहेत. असा टोला एबीपी माझाशी बोलताना त्यांनी लगावला. हे ही वाचा.. चर्चा विलीनीकरणाची, तयारी राजकीय महाभूकंपाची?:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह TMCला ऑफर! काय होणार देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम? भारताच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचे प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ किंवा त्यांच्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे खरोखरच घडले, तर देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होतील. या सर्व संभाव्य राजकीय घडामोडींचा आणि इतिहासाचा घेतलेला हा सविस्तर आढावा. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर