ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वि’चित्रा’ ताईंनी सवयीप्रमाणे नाक खुपसले:गॅस मिळेपर्यंत सामान्यांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांना सवाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ‘गॅस पुरवठा सुरळीत आहे’ असा दावा केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. सिलिंडर येईपर्यंत 25 दिवस आम्ही सामान्यांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? असा थेट सवाल खडसे यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गॅस सिलिंडरची प्रतिकृती हाती घेऊन निदर्शने केली. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आंदोलनात हस्तक्षेप करत ‘गॅस पुरवठा सुरळीत असून बुकिंग केल्यावर 25 दिवसांत सिलिंडर मिळते’ असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाचा समाचार रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला आहे.

रोहिणी खडसे यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांचा उल्लेख ‘विचित्रा ताई’ असा करत खोचक टीका केली. “काल गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना विचित्रा ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले. ताई म्हणतात सिलिंडर 25 दिवसांत मिळते. अहो ताई, जर एखाद्या सामान्य गृहिणीच्या घरचा गॅस आज संपला असेल, तर तिने 25 दिवस काय करावं? 25 दिवस वाट पाहायची का? बरं, पाहतो वाट! पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का?” असा उपरोधिक सवाल खडसे यांनी केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर