ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

केळापूर तालुका प्रेस क्लबतर्फे घुबडी येथील मुलींची क्रिकेट टीम दत्तक

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ग्रामीण मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा उपक्रम

पांढरकवडा | प्रतिनिधी : सागर मुडे

ग्रामीण भागातील मुलींमध्ये खेळाविषयी आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने केळापूर तालुका प्रेस क्लबने घुबडी येथील मुलींची क्रिकेट टीम दत्तक घेतली आहे. जनहित संस्था, पांढरकवडा यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “निर्मिती – The Gang of Girls” या उपक्रमांतर्गत ग्रामीण मुलींसाठी विशेष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


दि. १८ जानेवारी २०२६ रोजी कोब्बई (कोपा मांडवी) येथे ही भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत टिपेश्वर परिसरातील विविध गावांमधील मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. याच स्पर्धेमध्ये घुबडी येथील मुलींच्या क्रिकेट टीमला केळापूर तालुका प्रेस क्लबने प्रायोजित केले.

ग्रामीण भागातील मुलींना खेळासाठी मर्यादित संधी उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत खेळाच्या माध्यमातून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता यावी, यासाठी केळापूर तालुका प्रेस क्लबतर्फे घुबडी येथील महिला क्रिकेट टीम दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी केळापूर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष विशाल मग्गीडवार यांनी सांगितले की, भविष्यातही सामाजिक व लोकहिताच्या उपक्रमांसाठी प्रेस क्लब सदैव तत्पर राहील. तसेच या उपक्रमाचे आयोजन करणारे जनहित संस्थेचे सुबोध काळपांडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांनी आभार मानले.

प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष गणेश अनमुलवार यांनी सांगितले की, “मुलींसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो त्यांच्या ओळखीचा, सन्मानाचा आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण मुलींना स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळते.”
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आशिष बडवे, सुबोध काळपांडे, नितीन बाराहाते, अतिक शेख, निखिल बेले, सागर मुडे, युनूस शेख, सुरज बंडीवार, बाळा सस्ते, सुरज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर