ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

घरांची छप्परे उडाली, संत्रा बागांचे अतोनात नुकसान,:उंबरखेड, भारसवाडीत वादळी वाऱ्याचा बसला तडाखा, शेतकरी आणि ग्रामस्थ झाले हवालदिल‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मृग नक्षत्र उजाडूनही कडक उन्हाची तीव्रता कायम असल्याने नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच सोमवारी ८ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड आणि भारसवाडी परिसरात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने प्रचंड थैमान घातले. या वादळाचा सर्वाधिक फटका उंबरखेड आणि भारसवाडी गावांना बसला असून, शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील छप्परे उडाल्याने गरिबांचा संसार उघड्यावर आला आहे. सोमवारी दुपारी झालेल्या या जोरदार वादळामुळे उंबरखेड येथील शेतकरी कुंदन आनंद कळंबे यांच्या संत्रा बागेचे अतोनात नुकसान झाले. त्यांच्या बागेतील भरघोस उत्पादन देणारी तब्बल ७४ संत्रा झाडे मुळासकट उन्मळून पडली. झाडांवर आलेली संत्रा फळेही उर्वरित,पान.४ टीनपत्रे सुमारे १०० मी. अंतरावर जाऊन पडली उंबरखेड गावामध्ये आलेल्या या वादळाची तीव्रता एवढी भीषण होती की, गावांमधील अनेक घरांवरील आणि गुरांच्या गोठ्यांवरील टीनपत्रे उडून १०० मी. दूर जाऊन पडली. अचानक छप्परे उडाल्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला असून घरात ठेवलेले अन्नधान्य व साहित्याचे नुकसान झाले आहे. वादळामुळे गावातील अनेक विद्युत पोल वाकले तर काही ठिकाणी उन्मळून पडले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर