ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पाण्यासाठी चव्हाण वस्तीवरील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा:सरपंच कसबे यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुस्ते (ता. पंढरपूर) येथील चव्हाणवस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी डोक्यावर घागरी आणि हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चव्हाणवस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याने दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकदा शेजारच्या शेतकऱ्यांच्या विहिरी किंवा विंधन विहिरीवरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मोर्चामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर सरपंच कसबे यांनी आंदोलक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले. संपूर्ण गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत योजना मंजूर झाली होती मात्र, संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. ठेकेदाराने जाणीवपूर्वक कामात हलगर्जीपणा केल्याची संतप्त चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. जलजीवनच्या संथ कारभाराचा फटका

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर