ब्रेकिंग न्यूज
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video
SP News Maregaon

शरद पवारांची तब्येत बिघडली:पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये होणार उपचार; सततच्या दगदगीने प्रकृती बिघडल्याची माहिती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जाणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. त्यानंतर आता त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले होते. त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना बसला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर सातत्याने ते श्रद्धांजली कार्यक्रम, भेटीगाठी आणि राजकीय चर्चा आदी कार्यक्रमांत व्यस्त होते. यामुळे त्यांची दगदग वाढली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. आज अजित पवार यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी घरीच विश्रांती घेणे पसंत केले होते; मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर त्यांना डॉक्टरांच्या सल्लानुसार रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यात आणण्यासाठी विशेष व्यवस्था शरद पवार यांना बारामतीहून पुण्यात आणण्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यात कार्डियाक सुविधांनी सज्ज अशी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. प्रवासादरम्यान वैद्यकीय पथकही सोबत असणार आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर सिमोन ग्रँट यांच्या निगराणीत उपचार केले जातील. रुग्णालयाचे सल्लागार अली दारुवाला यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवारांच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्यावरील पुढील उपचारपद्धती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी बातमी समोर येताच पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली असतानाच शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. हे ही वाचा… परभणीकरांनी सुरेश वरपुडकरांची घराणेशाही नाकारली:कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवारांचा दारुण पराभव; केवळ पुतण्यावर विजयाचा गुलाल

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदारांनी राजकारण्यांची थोपली जाणारी घराणेशाही नाकारली आहे. परभणी जिल्ह्यातील निवडणुकीत मतदारांनी भाजप नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवारांचा पराभव करून वरपुडकरांना जोरदार झटका दिला आहे. या निवडणुकीत वरपुडकर यांच्या केवळ एका पुतण्याचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर