ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

राजकारणात खुर्ची माणसापेक्षा महत्त्वाची:शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी हे निर्णय व्हायला नको होते, मनाला न पटणारी गोष्ट- संजय शिरसाट

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राजकारणात गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या घडामोडी पाहिल्या यामुळे असे वाटते की माणसांपेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली आहे, सार्वजनिक जीवनातही खुर्चीच जिंकली आणि माणूस हरल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्व सामान्य माणसांना या गोष्टी भावत नाहीत, शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी हे सर्व निर्णय व्हायला नको होत असे मला वाटते, असे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केले आहे त्याकडे जर पाहिले तर राजकारणातील घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारले गेले नसावे. पक्षातील नेत्यांनी आणि राजकीय सल्लागारांनी घेतलेला हा निर्णय शरद पवारांना याबद्दल कितपत माहिती आहे हे सांगणे शक्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जी उपमुख्यमंत्रीपदाबाबत जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आमची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाना पाठिंबा देणं हे आम्हाला गरजेचे आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही विरोध करणार नाही. म्हणून पवारांनी शंका व्यक्त केली असेल संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते त्यांच्या शब्दाच्या आणि निर्णयाविरोधात जाण्याची कोणत्याही नेत्याची ताकद नव्हती. त्यांची शरद पवार किंवा इतर नेत्यांशी जी बैठक झाली आहे असे जे म्हणतात त्यात जो निर्णय झाला असता तो सर्वांनी मान्य केला असता. पण आता मला वाटते परिस्थिती आता बदललेली आहे. आता सामूहिक निर्णयाचे एक सामूहिक वारे राजकारणामध्ये सुरू झाले आहे म्हणून शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाच्या चर्चेमध्ये खंड पडेल अशी शंका व्यक्त केली आहे. फडणवीस अन् आमची भूमिका एकच संजय शिरसाट म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण ही त्यांची पहिला भूमिका होती. यावर त्यांच्या पक्षाची चर्चा झाली, ते एकत्र आले असते तर ते केंद्रात एनडीए आणि राज्यात ते महायुतीमध्ये आले असते आणि त्याच पद्धतीचे राजकारण पुढे चालले असते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नेते आहेत ते सुनेत्रा पवारांनाच पुढे करतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर