ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

संघर्ष अन् अडचणींतून उभे राहिलेले मार्केट आज राज्यात अग्रगण्य- गडाख:घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 6 नव्या व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुमारे २५ वर्षांपूर्वी अनेक अडचणी, आव्हाने आणि मर्यादा असतानाही आम्ही घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात हे मार्केट उभे करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या भक्कम सहकार्यामुळेच हे मार्केट आज महाराष्ट्रातील प्रमुख आणि अग्रेसर कांदा मार्केटपैकी एक म्हणून नावारूपास आले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.” हे नवीन ६ गाळे बाजारातील घटकांना अधिक सुविधा देणारे ठरतील, असा विश्वास माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप-आवार असलेल्या घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा मार्केटमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ६ अद्ययावत व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ शुक्रवारी झाला. माजी मंत्री गडाख यांच्या हस्ते गाळ्यांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नंदकुमार पाटील, व्हा. चेअरमन नानासाहेब नवथर, नानासाहेब रेपाळे, अशोकराव येळवंडे, बाळासाहेब सोनवणे, राजेंद्र सानप आणि सचिव देवदत्त पालवे यांच्यासह परिसरातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाळ्यांच्या उद्घाटनानंतर माजी मंत्री गडाख यांनी घोडेगाव येथील प्रसिद्ध शेळी, मेंढी, म्हैस आणि गाईंच्या पशू बाजाराला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी तेथील शेतकरी, व्यापारी आणि हॉटेल चालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. येत्या काही दिवसांवर आलेल्या ईदच्या सणामुळे आजच्या पशू बाजारात मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात अत्यंत आकर्षक आणि धष्टपुष्ट बोकड विक्रीसाठी दाखल झाले होते. यातील काही विशेष बोकडांची विक्री चक्क लाखो रुपयांना झाल्याची माहिती समोर आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर