ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

गोरेगाव पाठोपाठ वरळीच्या NSCI क्लबमध्ये ड्रग्जचा शिरकाव?:लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका तरुणाचा अचानक मृत्यू, एक गंभीर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


​मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय (NSCI) क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्टीत ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. संगीत कार्यक्रम रंगात आलेला असतानाच हा प्रकार घडल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीत कार्यक्रम सुरू असतानाच संबंधित व्यक्तीची प्रकृती अचानक खालावली. त्याला तातडीने प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अनपेक्षित घटनेमुळे कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या हजारो संगीतप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ‘ड्रग्ज’ कनेक्शनचा पोलिसांना संशय? सध्या या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. विशेषतः या संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांचे सेवन झाले होते का? आणि मृत व्यक्तीने काही अंमली पदार्थांचे सेवन केले होते का? या शंकेच्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास चक्र फिरवली आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील अशाच एका मोठ्या संगीत कार्यक्रमात ड्रग्जच्या संशयावरून मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. सीसीटीव्ही आणि आयोजकांची चौकशी सुरू “शवविच्छेद अहवाल आणि इतर वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष आल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, आयोजकांकडील नोंदी आणि प्रत्यक्षदर्शी उपस्थितांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. कोणताही घाईघाईने निष्कर्ष न काढता सर्व पुराव्यांची काटेकोर तपासणी करूनच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर