ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

रूपाली चाकणकरांनी खरातांना पाठबळ दिले, महिलांना नाही!:संपदा मुंडे, पूजा चव्हाण प्रकरणांत तुम्ही कुणाची बाजू घेतली?- करुणा मुंडे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत अशोक खरात सारख्या लोकांना पाठबळ दिले. त्यांनी महिला आयोगाच्या पदाचा मान राखला नाही. महिला म्हणून रुपाली चाकणकर यांनी कुणी टार्गेट करत नाहीये. तुम्ही जे केले ते तुम्हाला भोगावे लागत आहे, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, संपदा मुंडे, पुजा चव्हाण, गौरी गर्जे, करुणा मुंडे, रेणू शर्मा या प्रकरणात तुम्ही कुणाची बाजू घेतली. चाकणकर खरातांना गुरू मानत होत्या आणि त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. ज्यांच्याविरोधात तुमच्याकडे तक्रारी आल्या त्यावर तुम्ही काय केले. संपदा मुंडेला न्याय मिळवून दिला का तुम्ही? तुमच्यावर अटकेची तलवार आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेला साथ दिली पाहिजे अशा प्रवृत्तीच्या लोकांना नाही. काम करणाऱ्या महिलेकडे आयोगाचे पद द्यावे करुणा मुंडे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनी थोडासा विचार केला पाहिजे की आपण काय करतो आहोत. चुकीचे काम करणाऱ्याविरोधात आम्ही लढत राहणार आहोत. मागच्या वेळी आम्ही धनंजय मुंडे यंचा राजीनाम्यासाठी प्रयत्न केले आणि आता रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. लवकरात लवकर चांगली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांनी नेमावी अशी मी सीएम फडणवीस यांनी विनंती करते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात 2023पासून त्यांनी पुकारलेल्या युद्धाला अखेर यश आले असून, चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मोठे वादळ उठले होते, तेव्हाही करुणा मुंडे यांनी दिलेली तारीख आणि वेळ खरी ठरली होती. आजही नेमकी तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. यामुळेच आता राजकीय वर्तुळात ‘करुणा मुंडे फॅक्टर’ची दहशत निर्माण झाली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली ही मोहीम आता भ्रष्ट आणि कर्तव्यशून्य व्यवस्थेला हादरा देणारी ठरत आहे. एका स्त्रीने ठरवले तर ती मोठ्या मोठ्या सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणू शकते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर