ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

खरातची नाशिक रोड तुरुंगात रवानगी:कोठडीतून आज ईडी ताब्यात घेणार, जगदंबा पतसंस्था गैरव्यवहार, संस्थापक आवारेलाही न्यायालयीन कोठडी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेतील लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले मुख्य संशयित अशोक खरात आणि पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी (दि. १८) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने कडक बंदोबस्तात त्यांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी न्यायमूर्ती एल. सी. वाडीकर यांनी फेटाळून लावली असून, दोन्ही संशयितांची थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ३२ बनावट खात्यांचे गूढ स्वत:ला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरात याने कुंदेवाडीच्या जगदंबा पतसंस्थेत तब्बल ३२ बनावट बँक खाती उघडली होती. या खात्यांद्वारे लाखो रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार करून फसवणूक केल्याचा गुन्हा सिन्नर पोलिसांत दाखल आहे. या गुन्ह्यात गेल्या आठवड्यात पोलिसांनी खरातचा नाशिक रोड कारागृहातून ताबा घेतला होता, तर आवारे यांना त्यांच्या मुसळगाव कार्यालयातून अटक केली होती. पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी न्यायमूर्ती एल. सी. वाडीकर यांनी फेटाळून लावली असून, दोन्ही संशयितांची थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनंतर ईडीचा ससेमिरा खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ईडीने नाशिक न्यायालयात खरातचा ताबा घेण्यासाठी अर्ज दाखल केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी देवकर यांच्या न्यायालयाने खरातचा ताबा ईडीकडे देण्याचे आदेश दिले. कोणत्याही क्षणी ईडीचे पथक मध्यवर्ती कारागृहातून खरातचा ताबा घेणार आहे. खरातविरोधात ईडीने मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर