ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींची चोरी:संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले- भाजप 15 लाख कोटींच्या घोटाळ्यावर गप्प का?

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल पाच कोटी रुपये चोरीला गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, देशातील महत्त्वाच्या संस्थांवर आणि धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राम मंदिरासारख्या श्रद्धास्थानातही आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीही विरोधी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 12 वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, सरकारने आपल्या कारभाराचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणीही राऊत यांनी केली. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना खुले पत्र लिहून कथित राजेश एक्सपोर्ट्स घोटाळ्याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. देशभरात गाजत असलेल्या या प्रकरणात तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप होत असताना भाजप आणि केंद्र सरकार मौन का बाळगत आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊतांचे किरीट सोमय्यांना खुले पत्र संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात राजेश एक्सपोर्ट्स आणि त्याचे प्रमोटर यांच्याविरोधात गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप असल्याचा उल्लेख केला आहे. महसूल फसवणूक, परदेशी उपकंपन्यांमार्फत निधी हस्तांतरण, खोट्या व्यवहारांच्या नोंदी आणि मनी लॉन्ड्रिंगसारख्या बाबींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रात राऊत यांनी एलआयसीच्या गुंतवणुकीचाही मुद्दा उपस्थित केला आहे. कंपनीच्या शेअरमधील घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदारांसह पॉलिसीधारकांच्या पैशांवर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बॅटरी उत्पादनाशी संबंधित PLI योजनेअंतर्गत कंपनीला मिळालेल्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. राऊतांकडून कठोर कारवाईची मागणी किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातही त्यांनी तितक्याच आक्रमकपणे भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत राऊत यांनी संसदेत आणि सार्वजनिक व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच केंद्र सरकारकडून निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणीही केली आहे. पत्रात केंद्र सरकारवरही थेट निशाणा राऊत यांनी पत्रात केंद्र सरकारवरही थेट निशाणा साधला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्यांनी या प्रकरणात मात्र मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. “भ्रष्टाचाराविरोधातील लढा हा निवडक प्रकरणांपुरता मर्यादित नसावा. सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्तींवर आरोप होत असतील, तर त्यांचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,” असे नमूद करत राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात आघाडी घेऊन जनतेसमोर सत्य आणावे, असे आवाहन केले. तसेच संसदेत आणि विविध सार्वजनिक मंचांवर हा मुद्दा उपस्थित करण्याची मागणीही त्यांनी केली. संजय राऊत यांचे पत्र…
राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम:म्हणाल्या- मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता, विचारधारेशी तडजोड नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना खासदार नवनीत राणा यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी पक्षांतराच्या सर्व शक्यतांना फेटाळून लावले. राज्यसभा उमेदवारीसंदर्भातील पडद्यामागील घडामोडींवरही त्यांनी प्रथमच भाष्य केले. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर