ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अमरावती विधान परिषद निवडणूक:प्रवीण पोटेंनी घेतली रवी राणांची भेट, राणांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा मार्ग सुकर, काँग्रेस उमेदवार रुग्णालयातच

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्यातील जुना राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून दोघांमध्ये ‘मनोमिलन’ घडून आले आहे. पोटे यांनी थेट राणा यांच्या अमरावती येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणा आणि त्यांचे बंधू सुनील राणा यांनी पोटे यांचे जंगी स्वागत केले. वरिष्ठ पातळीवरून झालेल्या ‘पॉवर गेम’नंतर महायुतीने आपली फळी भक्कम केली असतानाच, दुसरीकडे मात्र काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजयासाठी 227 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे कागदावर हक्काची 250 मते असली, तरी त्यात भाजपची 152 मते आहेत. उर्वरित मतांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे 26 नगरसेवक आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांचा मोठा गट आहे. ही मते पोटे यांच्या विजयासाठी अत्यंत निर्णायक मानली जात होती. राणा दाम्पत्याची सुरुवातीची साशंक भूमिका पोटे यांच्या गोटात चिंता वाढवणारी ठरत होती. कोणतीही राजकीय जोखीम पत्करायची नसल्याने पोटे यांनी थेट राणांचे दार गाठले. आता युवा स्वाभिमानची ही 26 मते पोटे यांच्या पारड्यात अधिकृतपणे पडणार असल्याने महायुती ‘सेफ झोन’मध्ये पोहोचल्याचे चित्र आहे.

मविआच्या गोटात नैराश्य महायुतीने आपली अंतर्गत डॅमेज कंट्रोलची फळी मजबूत केली असताना, महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसमध्ये अभूतपूर्व गोंधळ आणि उदासीनतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे गेल्या पाच दिवसांपासून अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले, ते थेट नागपूरच्या एका रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवाराच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या प्रचाराचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच काँग्रेसच्या नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्वपक्षाच्या उमेदवारावर 15 ते 20 कोटी रुपयांचा ‘घोडेबाजार’ करून निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप केल्याने मविआच्या गोटात पुरते नैराश्य पसरले आहे. बावनकुळेंची शिष्टाई फळाला पोटे आणि राणा यांच्यातील हे मनोमिलन घडवून आणण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. बावनकुळे यांनी सातत्याने राणा यांच्या संपर्कात राहून पडद्याआडून सूत्रे हलवली. तर काही दिवसांपूर्वीच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या बैठकीत फडणवीसांनी पोटे यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीने पाठीशी राहण्याचे कडक निर्देश राणा यांना दिले होते. वरिष्ठ पातळीवरील याच तडजोडीनंतर अमरावतीच्या राजकारणातील या नव्या समीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर