ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

वाढती महागाईवरून काँग्रेस आक्रमक:काँग्रेसने चुलीकडून गॅसवर आणले, भाजपने देशाला पुन्हा चुलीकडे नेले- विजय वडेट्टीवार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशातील सध्याच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महागाईच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने नवी मुंबई येथे आंदोलन केले होते. त्यानंतर आता कॉंग्रेसनेही सरकारवर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, कॉंग्रेसने देशाला चुलीकडून गॅसकडे नेले, देशाला पुन्हा गॅसकडून चुलीकडे नेण्याचे काम भाजप करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, हे सरकारचे धोरणच आहे, हीच सरकारची उपलब्धी आहे. आम्ही चुलीवरून गॅसवर आणले आणि आता या सरकारने गॅसवरून चुलीकडे नेण्याचा निर्धार केला आहे. ही परिस्थिती आता महाराष्ट्रात तयार झाली आहे. हजार रुपयांचे सिलिंडर तर आत्ता झाला आहे, पुढचा महिना थांबा हेच सिलिंडर 1500 वर पोहोचेल आणि लोक पुन्हा चुलीकडे येतील. आता चुलीतला कोलीत घेऊन सरकारला कसे चटके द्यायचे आहेत हे जनता ठरवेल. पण एक सांगतो की सामान्य माणूस आणि माध्यमवर्ग असेल किंवा गरीब माणूस असेल ते चुलीवर स्वयंपाक करून डोळ्यात धूर घालून त्याच्या डोळ्यातले अश्रू पुन्हा जोराने वाहतील अशीच व्यवस्था या सरकारने केली आहे. या कर्जमाफीचा थेट फायदा होणारच नाही पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य करत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, सरकारच्याकडे आहे काय कर्जमाफी करायला? त्यांनी आम्ही दिलेल्या कर्जमाफीमध्ये 2019 पासूनच्या त्या लोकांना सुद्धा वगळून टाकले आहे. जे आम्ही 50 हजार रुपये प्रोत्साहन देत होतो, त्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी करून टाकली आहे. आणि या कर्जमाफीचा थेट फायदा होणारच नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ही कर्जमाफी फसवी आणि बनवाबनवीची विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही सरसकट माफी नसून अटी आणि शर्थी लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे ती संख्या दाखवत आहेत ती संख्या सुद्धा यात बसणार नाही. याचे कारण असे आहे की, 2 लाख रुपये भरतील पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही. तर ते देण्याची ऐपत शेतकऱ्याकडे नाही. म्हणजे यांचे 2 लाख देऊन उपयोग नाही आणि ते 3 लाख भरल्याशिवाय त्याचे ते 2 लाख रुपये देणार नाहीत. त्यामुळे मला असे वाटते की हा आकडा फार तर 15-20 लाखांच्या आसपास जाईल. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसून ही फसवी आणि बनवाबनवीची कर्जमाफी असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर