ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

गरीब नगरमधील कारवाईचा बदला!:मुंबईला हादरवणाऱ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघड; तपासात धक्कादायक माहिती समोर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील गरीब नगर परिसरात महापालिकेने धडक मोहीम राबवत पाच दिवसांत 400 हून अधिक अवैध बांधकामे जमीनदोस्त केली होती. याच अतिक्रमणविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी थेट देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने केलेल्या सखोल तपासात हा भयंकर प्रकार समोर आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून अनेक गंभीर आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या दहशतवाद्यांच्या रडारवर प्रामुख्याने मुंबई पोलिस, विविध सुरक्षा यंत्रणा आणि शहरातील अतिमहत्त्वाची तसेच सर्वाधिक गर्दीची ठिकाणे होती. पोलिसांवर थेट हल्ला करण्यासोबतच महत्त्वाच्या ठिकाणी मोठे स्फोट घडवून आणत संपूर्ण मुंबईत दहशत माजवण्याचा या संशयितांचा मुख्य उद्देश असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. हँडलर्ससोबत झालेले चॅट्सही तपास यंत्रणांच्या हाती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे जप्त केले आहेत. आरोपींच्या मोबाईल आणि इतर उपकरणांची तपासणी केली असता, त्यात मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि फोटो आढळून आले आहेत. यावरून दहशतवाद्यांनी शहराची सविस्तर रेकी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, परदेशात बसलेल्या त्यांच्या हँडलर्ससोबत झालेले चॅट्सही तपास यंत्रणांच्या हाती लागले असून, त्यातून या कटाची व्याप्ती आणि भीषणता स्पष्ट होत आहे. आयएसआयचा हात असल्याचा संशय या दहशतवादी कटाचे धागेदोरे थेट सीमेपार पोहोचले आहेत. या संपूर्ण कटात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा यांच्यासह काही प्रमुख विदेशी सूत्रधारांचा मोठा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. या परदेशी हँडलर्सच्या थेट इशाऱ्यावरून आणि त्यांनी पुरवलेल्या आर्थिक रसदीवरच मुंबईत हा कट शिजत होता. सध्या तपास यंत्रणा या सर्व मुख्य विदेशी सूत्रधारांच्या भूमिकेचा सखोल तपास करत आहेत. मुंबई पोलिस आणि दहशतवादी पथक हाय अलर्टवर मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा हा भयंकर कट उघडकीस आल्यानंतर, मुंबई पोलिस दल आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अत्यंत सतर्क झाले असून त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रत्येक संशयास्पद हालचालीवर करडी नजर ठेवली जात आहे. या दहशतवाद्यांना मुंबईत राहण्यासाठी किंवा रेकी करण्यासाठी स्थानिक पातळीवरून कोणी रसद पुरवली होती का, याचा शोध घेण्यासाठी ‘स्लीपर सेल’ आणि स्थानिक नेटवर्कचीही कसून चौकशी सुरू आहे. दिल्ली स्पेशल सेलच्या या तत्पर कारवाईमुळे सुदैवाने मुंबईवर येऊ पाहणारे एक मोठे संकट टळले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर