ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर गुन्हा दाखल; माहेरच्यांकडून घातपाताचा संशय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विवाहित महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मात्र, विवाहितेच्या या मृत्यूवर महिलेच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून हा घातपात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी माढा पोलिसांत मृत विवाहितेच्या शिक्षक असलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे पुढील तपास देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे. भाग्यश्री रवींद्र क्षीरसागर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी टीच्या भावाने माढा पोलिस ठाण्यात तिच्या पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाग्यश्री यांचे 2011 साली विवाह झाला होता. लग्नानंतर पतीकडून दारूच्या नशेत मारहाण, शिवीगाळ, तसेच माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर चारित्र्यावर संशय घेऊन त्रास दिला जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. घरातील उघड्या विद्युत तारांच्या निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का बसून आणि त्यानंतर खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन भाग्यश्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असल्याने, मृत भाग्यश्री यांचे पती आणि शिक्षक असलेले रवींद्र क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, ही घटना केवळ एक अपघात आहे की यामागे काही कट आहे, याचे सत्य तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर