ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

बीबीए, बीसीए सीईटीचा निकाल जाहीर:राज्यातील 5 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादीही प्रसिद्ध

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आज, गुरुवारी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. एमएचटी सीईटी (MHT-CET) पीसीबी ग्रुपच्या निकालानंतर आता बहुप्रतिक्षित बीबीए (BBA), बीसीए (BCA), बीएमएस (BMS), बीबीएम (BBM) आणि बीएचएमसीटी (BHMCT) या अभ्यासक्रमांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या परीक्षेत राज्यातील ५ गुणवंतांनी परिपूर्ण ‘१०० पर्सेन्टाईल’ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. ही सामायिक प्रवेश परीक्षा २८ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ४ सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती. या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्यभरातून एकूण ७१ हजार ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. परीक्षेला विद्यार्थ्यांची उपस्थिती तब्बल ८७.६६ टक्के इतकी लक्षणीय होती. या विद्यार्थ्यांनी घेतले १०० टक्के गुण यंदाच्या निकालात ५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. यात ठाणे, पुणे, सोलापूर, रायगड आणि थेट राजस्थानमधील जयपूरच्या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. अर्जुन ब्रीद – ठाणे इभाड वेदांत राजेश – पुणे खिल्ती हेमल शाह – सोलापूर ओजस उदय पोवार – रायगड निकेत खत्री – जयपूर (महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी) विविध प्रवर्गांतील गुणवंतांची यादी सीईटी सेलने मुख्य निकालासोबतच विविध सामाजिक प्रवर्गांनुसार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘टॉपर’ यादी देखील जाहीर केली आहे. पुढील प्रवेश प्रक्रिया लवकरच परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचा सविस्तर निकाल आणि गुणपत्रिका (Score Card) सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी त्यांचे लॉगिन आयडी वापरून गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात. या निकालानंतर आता महाविद्यालयांमधील प्रवेशासाठीची पुढील ‘कॅप’ (CAP) प्रक्रिया आणि त्याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती सीईटी प्रशासनाने दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर