ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मनसेचे नगर येथील 2 उमेदवार कालपासून गायब:कुटुंब अन् पक्षाच्या नेत्यांशीही संपर्क नाही; राज ठाकरे पोलिस प्रशासनाच्या संपर्कात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गुरुवारपासून गायब झालेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना त्यांचा अद्याप त्यांच्या कुटुंबीयांशी व पक्षनेत्यांशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे ते कुठे गेले? व त्यांचा संपर्क का होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. 68 सदस्यीय अहिल्यानगर महापालिकेसाठी येतत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. त्यानंतर 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्याप हिल्या दिवशी 28 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यात आज पुन्हा अधिकची भर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे 2 उमेदवार गुरुवारपासून बेपत्ता झालेत. ते कुठे गेलेत? याची कोणतीही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना व नेत्यांना नाही. केडगावचा इतिहास रक्तरंजित यासंबंधीच्या माहितीनुसार, राहुल जाधव व अंबरनाथ भालसिंग अशी गायब झालेल्या मनसेच्या उमेदवारांची नावे आहेत. हे दोघेही प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार आहेत. ते कालपासून बेपत्ता झालेत. तेव्हापासून त्यांचा कोणताही संपर्क त्यांच्या कुटुंबीयांशी झाला नाही. ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल केला नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी या कार्यकर्त्यांच्या गायब होण्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. केडगावचा इतिहास हा रक्तरंजित आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या उमेदवारांचे कुटुंबीय जसे काळजी पडले आहे, तसे आम्हीही काळजीत पडलो आहोत. या प्रकरणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहेत. पण ही मनसे आहे. आमच्या अंगावर याल तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा सचिन डफळ यांनी केला आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात मोठे बदल उल्लेखनीय बाब म्हणजे 2018 च्या महापालिका निवडणुकीनंतर अहिल्यानगरच्या राजकीय समीकरणांत मोठा बदल झाला आहे. शहराच्या राजकारणात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मधल्या काळात फूट पडली आहे. यामुळे महापालिकेचे राजकीय चित्र बदलले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित पवार गटाचे, तर शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटाकडे गेलेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील या दोन्ही गटांच्या प्रतिस्पर्धी गटांची म्हणजे शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटांकडे नाममात्र नगरसेवक उरलेत. पण असे असले तरी महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी नव्या जोमाने तयारी केली आहे. अजित पवार गटाचे 2 उमेदवार बिनविरोध महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कुमारसिंह वाकळे व प्रकाश भागानगरे हे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. या दोघांच्या विरोधातील इतर उमेदवारांचे अर्ज एकतर बाद झालेत किंवा त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या दोघांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. कुमार सिंह वाकळे हे प्रभाग क्रमांक 8 ड मधून निवडून आलेत. तर प्रकाश भानागरे हे प्रभाग क्रमांक 14 अ मधून बिनविरोध निवडून आलेत. वाकळे व भागानगरे हे यापूर्वीही नगरसेवक होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर